मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ नाही, काँग्रेसची टीका
राज्यात या वर्षी सरासरी 25 टक्के पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे, शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. शेतकरी मोठ्या संकटात असून आत्महत्या वाढत आहेत. राज्य सरकारने कर्जमाफी केली, त्याचा फायदा झालेला नाही. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्याला बसत आहेत; पण महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवत्ते अतुल लोंढे यांनी सरकारवर टीका केली.
सोयाबीन, कापसाचे उत्पन्न या वर्षी पावसाअभावी कमालीचे कमी होण्याचे चित्र आहे. तूर, मूग, उडीद यासह डाळींब, केळी, पेरू अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या योजना फक्त कागदावरच दिसत असून कर्जमाफी व मदतीच्या नावाखाली सरकारने शेतकऱयांची थट्टा चालवली आहे, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.
Comments are closed.