शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगर
हेमलाटा पाटील: विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी अखेर बुधवारी शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश केला. त्यांच्यासोबत नाशिकरोडच्या ठाकरे गटाच्या चार टर्म नगरसेविका असलेल्या माजी उपमहापौर, व्यापारी बँकेच्या संचालिका रंजना बोराडे (Ranjana Borade) आणि सिडकोतील दीपक दातीर (Deepak Datir) यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे शिंदे गटाने एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
नवी दिल्लीत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. हेमलता पाटील या काँग्रेसमध्ये (Congress) नाराज होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या काँग्रेस सोडतील, अशी चर्चा होती. अखेर बुधवारी त्यांनी शिडे गटात प्रवेश केला. जॉय कांबळे यांनीही दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसचा हात सोडला होता. त्यामुळे काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहे.
ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकही शिंदे गटात दाखल
तर उबाठाचे माजी नगरसेवक व युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर यांच्या प्रवेशाने ठाकरे गटालाही धक्का बसला आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याला खा. नरेश म्हस्के, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोहे, मंत्री प्रताप जाधव, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह कार्यकर्ते व नेतेमंडळी उपस्थित होती.
शिंदेंची काम करण्याची पद्धत विलासरावांसारखी : हेमलता पाटील
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हेमलता पाटील म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासारखी आहे. शिंदे यांच्याकडून मी कोणतेही आश्वासन घेतले नाही. काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये आजपर्यंत काम केले आहे. आणि एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर मला विलासराव देशमुख यांची आठवण येते. सतत जो कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असणारा व्यक्ती आणि मला असे वाटत होते की, त्याच व्यक्तीची आता गरज आहे. आणि त्या व्यक्तीच्या हाताखाली आपण काम केले पाहिजे. त्यामुळे मी शिंदे सेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=LGF2RB229D8
शिंदेंच्या नाशिक दौऱ्याआधीच शिवसेनेत मोठं इनकमिंग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, माजी नगरसेविका रंजना बोराडे या लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 फेब्रुवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याआधीच शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.