ऑपरेशन क्रॅकडाऊनचा जिल्ह्यात धडाका, नांदेड पोलिसांच्या कारवाईत 18.15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नांदेड पोलिसांनी जिल्ह्यात ऑपरेशन क्रॅकडाऊनचा धडाका सुरूच आहे. ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत नांदेड पोलिसांनी वेगवेगळ्या अवैधरीत्या गोवंश जनावरे ताब्यात ठेवणार्या आरोपींवर मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 62 गोवंश जनावरे जप्त केली आहेत. मुक्रमाबाद आणि इतवारा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या या धडक कारवाईत एकूण 18 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.