तुझे तुकडे करुन तळ्यात टाकतो, उपसरपंच पदाचा राजीनामा देत नाही म्हणून बीडमध्ये एकाला बेदम मारहाण

बीड क्राईम न्यूज : बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या पिपरवाडा येथे उपसरपंच पदाच्या निवडीवरून एकास शिवीगाळ  करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर यावेळी मारहाण केलेल्या व्यक्तीला तुझे तुकडे करून पोत्यात भरून तळ्यात नेऊन टाकतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. गावात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक सुरु असताना हा प्रकार घडला आहे.

ग्रामपंचायत सदस्यांची बैठक सुरु असताना उपसरपंच निवडीवरून वाद

बीडच्या पिपरवाडा ग्रामपंचायत सदस्यांची बैठक सुरु असताना उपसरपंच निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. यावेळी रमेश पांडुरंग तिडके याला तू उपसरपंच पदाचा राजीनामा का देऊ देत नाहीस असे म्हणत लाकडाने मारहाण केली. या प्रकरणी रमेश पांडुरंग तिडके यांच्या फिर्यादीवरून महादेव मोकिंदा तिडके,विश्वनाथ व्यंका तिडके,सतीश मनोहर तिडके,शिवाजी मोकिंदा तिडके, वैजनाथ मोकिंदा तिडके, बाबासाहेब व्यंका तिडके,परमेश्वर शिवाजी तिडके, ज्ञानेश्वर मनोहर तिडके यांच्यावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.