“कॉस्मेटिक सर्जरीने पाकिस्तान क्रिकेट सुधारणार नाही,” पदावरून पायउतार झालेल्या माजी खेळाडूची टीका

पाकिस्तानचा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील त्यांची निराशाजनक कामगिरी चर्चचा विषयी बनली आहे. संघाची स्थिती पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी दौऱ्याच्या मध्यातच मोहम्मद रिझवान आणि इमाम उल हक यांच्यासह सात खेळाडूंना परत बोलावले. त्याचबरोबर बोर्डाने मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमल गुल यांनाही जबाबदारीतून मुक्त केले. आता एका माजी क्रिकेटपटूने बोर्डावर टीका केली आहे.

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य राष्ट्रीय निवडकर्ता मिस्बाह उल हक यांनी PCB वर टीका केली आहे. त्यांनी म्हटले, “केवळ वरवरच्या सुधारणांमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा होणार नाहीत.” याबरोबरच त्यांनी बोर्डावर परदेशी आणि स्थानिक प्रशिक्षकांबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोपही केला.

बोर्डाच्या निर्णयानंतर मिस्बाह यांनीही राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून राजीनामा दिला होता. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हटले, “हे खरं आहे की पाकिस्तान क्रिकेटमध्ये स्थानिक आणि परदेशी प्रशिक्षकांना वेगवेगळी वागणूक दिली जाते. परदेशी प्रशिक्षकांपेक्षा स्थानिक प्रशिक्षकांनाच टीकेला अधिक सामोरे जावे लागते.”

“परदेशी प्रशिक्षक असण्यात काही चुकीचे नाही, मात्र मला न पटणारी एक बाब म्हणजे जे आपल्या (चाहते, समीक्षक, माध्यमे, पीसीबी) मनात परदेशी प्रशिक्षकांविषयी एक सौम्य भूमिका आहे,” असे मिस्बाह यांनी त्या कार्यक्रमामध्ये म्हटले आहे.

“केवळ दबावामुळे दिखाव्यासाठी सर्जरी करू नये. आपल्याला कामगिरी आणि परस्थितीचे विश्लेषण करून पुढे काय करायचे हा विचार करणे आवश्यक आहे,” असेही मिस्बाह यांनी म्हटले आहे. (“Cosmetic surgery won’t improve Pakistan cricket,” criticizes Misbah ul Haq PCB after Stepping down from his post)

Comments are closed.