Duleep Trophy Final: इशान किशनचे भन्नाट द्विशतक! ईस्ट झोनच्या कर्णधाराची पुजारा-वाडेकर यांच्या खास यादीत एंट्री, 31 वर्षांनंतर….

चेन्नईमध्ये सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशन याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे सोमवारी (७ ऑगस्ट) द्विशतक केले आहे. साउथ झोनविरुद्धच्या या सामन्यात इशानने २७० व्या चेंडूवर चौकार मारत हे विक्रमी द्विशतक झळकावले आहे.
इशानचे हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिलेच द्विशतक ठरले आहे. तसेच 31 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, दुलीप ट्रॉफीमध्ये ‘ईस्ट झोन’च्या फलंदाजाने द्विशतक झळकावले आहे.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द्विशतक करणारा इशान आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी रमण लांबा, यशस्वी जैस्वाल, चेतेश्वर पुजारा, अजित वाडेकर, अंशुमन गायकवाड, युसुफ पठाण आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी ही कामगिरी केली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.