शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाकडून अंतरिम जामीन
प्रशांत कोरटकर, कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव घेऊन इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Shivaji Maharaj) अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळालाय. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलाय. कोल्हापुरतील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याच्यावर हा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 11 मार्चला होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=jk_ey7supyg
दरम्यान, प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना धमक्या येत असल्या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली.. त्यानंतर त्या पोलीस स्टेशन मधून प्रसार माध्यमांशी न बोलता निघून गेल्या होत्या…इंद्रजीत सावंत यांना दिलेली धमकी तसेच महापुरुषांच्या अवमान प्रकरणी आज प्रशांत कोरटकरच्या कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलीस स्टेशन मध्ये येऊन पोलिसांची भेट घेतली होती.. सुमारे दीड तास प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी आणि काही नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होते.
प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने यानंतर प्रसार माध्यमाशी बोलणं टाळलं होतं.. मात्र, मिळालेल्या माहितीप्रमाणे कोरटकर यांच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणामुळे धमक्या मिळत असल्याचे तसेच कुटुंबाची बदनामी होत असल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.. मात्र, त्यांनी कुटुंबाला मिळत असलेल्या धमक्यांबद्दल कुठल्याही व्यक्ती किंवा घटनेचा उल्लेख आपल्या तक्रारीत केलेलं नाही..
पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकारली असली तरी त्या संदर्भात कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाही…
प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन
छत्रपती शिवाजी महाराज याच्या बद्दल आक्षेपार्ह विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी जामीन
कोल्हापुरतील जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये प्रशांत कोरटकर याच्यावर दाखल आहे गुन्हा..
पुढील सुनावणी 11 मार्चला
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.