क्रिकेट स्टार शुभमन गिल झाला अलाना कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या ‘बोलर्स’ ब्रँडचा चेहरा
मुंबई25 सप्टेंबर 2025 : अलाना कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (ACPL)च्या अलाना पेट सोल्यूशन्स (APS) विभागाने लोकप्रिय क्रिकेटपटू व युवा आयकॉन शुभमन गिलला आपल्या प्रमुख डॉग न्यूट्रिशन ब्रँड बोलर्सचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जाहीर केले आहे. या निमित्ताने एक उत्कृष्ट खेळाडू, विज्ञानाधारित आणि उच्च-गुणवत्तेच्या पाळीव प्राणी न्यूट्रिशन ब्रॅण्डशी जोडला गेला आहे. या नव्या भागीदारीमधून बोलर्सने भारतातील पेट न्यूट्रिशन क्षेत्रात नवा टप्पा गाठला आहे.
आज पाळीव प्राणी हे केवळ साथीदार न राहता घरातील कुटुंबातील सदस्य झाले आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी योग्य व संतुलित आहाराची गरज वाढत चालली आहे. शुभमन गिलसारखा शिस्त आणि उत्कृष्ट कामगिरीचे प्रतीक असलेला क्रिकेटपटू या ब्रँडसोबत आल्यामुळे पाळीव प्राण्यांच्या पालकांना योग्य पोषणाचे महत्त्व पटवून देण्यास मोठी मदत होणार आहे.
याबाबत अलाना पेट सोल्यूशन्सचे बिझनेस हेड श्री. नितीन कुलकर्णी म्हणाले, “भारतामध्ये पाळीव प्राण्यांची संख्या जलद गतीने वाढत आहे, विशेषतः टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर प्रीमियम, विज्ञानाधारित डॉग न्यूट्रिशन सहज उपलब्ध करून देण्याची मोठी संधी आहे. शुभमन गिल तरुणांमध्ये लोकप्रिय असून त्याची ओळख बॉलर्सला नव्या पाळीव प्राणी पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या सहयोगामुळे बोलर्स ब्रँडला अधिक विश्वासार्ह आणि वेगळे स्थान मिळवण्यास मदत होईल.”
बोलर्सने गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील उपक्रमांद्वारे पाळीव प्राणी पालकांना जोडून ठेवले आहे. #TasteThatMakesYourDogFly सारख्या उपक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता शुभमन गिलच्या सहकार्यामुळे डिजिटल प्रसार मोहिमा, प्रादेशिक कार्यक्रम आणि ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद यांद्वारे ब्रँडची ओळख आणखी मजबूत केली जाणार आहे.
बोलर्सच्या उत्पादनांमध्ये पिल्लांसाठी, प्रौढ आणि मोठ्या प्रजातींसाठी संतुलित ड्राय व वेट फूड तसेच उच्च-प्रोटीन ट्रीट्स आणि मीट बार्सचा समावेश आहे. शुभमन गिलसोबतच्या या सहयोगामुळे बोलर्सचा राष्ट्रीय स्तरावरील विस्तार, अधिक जागरूकता आणि पाळीव प्राणी पालकांशी दीर्घकालीन विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा टप्पा गाठला जाईल.
याशिवाय परफेटो हा APSचा खास मांजरींच्या पोषणासाठीचा ब्रँड असून त्यामुळे APS एक सर्वसमावेशक पेट न्यूट्रिशन कंपनी म्हणून उभी आहे. तेलंगणातील जहीराबाद येथे असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या स्वयंचलित पेट फूड उत्पादन प्रकल्पामुळे गुणवत्ता, सुरक्षितता आणि सातत्य टिकवले जाते. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार केलेल्या त्यांच्या फॉर्म्युलेशन्स भारतीय हवामान आणि पाळीव प्राण्यांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत आहेत. अलीकडेच या विभागाने ₹२०० कोटींचा महसूल पार केला असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर झपाट्याने प्रगती करत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.