मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; ओळखलं का कोण?

क्रिकेटर मुलगा बनला बॉलिवूड अभिनेता: टीम इंडियानं (Team India) तिसऱ्यांदा ICC मेन्स टी20 वर्ल्डकप 2026 ची (ICC Men’s T20 World Cup 2026) फायनल जिंकून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. देशभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यापूर्वी टीम इंडियानं 1983 मध्ये पहिल्यांदाच वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली होती आणि कोट्यवधी क्रिडाप्रेमींच्या मनावर आपली छाप सोडली. 1983 मध्ये जिंकलेला वर्ल्डकप भारतीय क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी होती. त्या ऐतिहासिक विजयात अशा अनेक खेळाडूंचा समावेश होता, ज्यांच्या कथा आजही लोकांना प्रेरणा देत आहेत. त्याच संघातला एक मराठमोळा क्रिकेटरचा मुलगा, वडील दिग्गज क्रिकेटर असूनही त्यानं कधीच सामना खेळला नाही. पण, त्यानं एका सिनेमात त्याच्याच वडिलांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली आहे. आम्ही ज्याच्याबाबत बोलत आहोत, तो  म्हणजे, क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील. ज्यानं रणवीर सिंह अभिनीत ’83’ सिनेमात (83 Movie) आपल्या वडिलांची, संदीप पाटील (संदीप पाटील) यांची भूमिका साकारली होती.

चिराग पाटीलचे वडील नावाजलेले क्रिकेटपटू

Chirag Patilcha (चिराग पाटील) Born 10 March 1987 Rosie मुंबईत झाला. त्याचे वडील संदीप पाटील हे भारतीय क्रिकेटमधील एक सुप्रसिद्ध नाव. चिरागचं बालपण क्रिकेटमय वातावरणात गेलं असलं, तरी त्यानं नेहमीच स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं ‘B.Sc. Hospitality Management’ ही पदवी प्राप्त केली. पण नशिबानं त्याला चित्रपटसृष्टीकडे वळवलं आणि त्यानं काही सिनेमे केले.

देव आनंद यांच्या फिल्ममधून ठेवलं बॉलिवूडमध्ये पाऊल

चिरागने आपल्या इंडस्ट्रीतल्या कारकिर्दीची सुरुवात 2011 मध्ये ‘राडा रॉक्स’ या मराठी सिनेमाद्वारे केली. त्यानंतर, देव आनंद यांच्या ‘चार्जशीट’ या चित्रपटाद्वारे त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यानं मराठी चित्रपटसृष्टीतही आपलं स्थान निर्माण केलं आणि आपल्या अभिनयकौशल्यानं प्रेक्षकांना भारावून टाकलं.

रणवीर सिंह स्टार सिनेमात साकारली स्वतःच्याच वडिलांची भूमिका

’83’ या सिनेमाचा भाग बनल्यामुळे चिरागच्या कारकिर्दीला विशेष प्रसिद्धी मिळाली. या सिनेमात त्यानं आपल्या वडिलांची, म्हणजेच संदीप पाटील यांची भूमिका साकारली. प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी ही एक अत्यंत उत्सुकतेची आणि बहुप्रतिक्षित भूमिका होती. स्वतः कधीही व्यावसायिक क्रिकेट न खेळलेल्या चिरागनं, आपल्या वडिलांची भूमिका साकारण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.

Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका

एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की, या चित्रपटाचा भाग होणं हे त्याच्यासाठी स्वप्न सत्यात उतरण्यासारखं होतं. हे काम त्याच्यासाठी आव्हानात्मक होतं, कारण प्रत्यक्ष क्रिकेटपटूंची भूमिका साकारणं सोपं नसतं, तरीही त्यानं अत्यंत कठोर परिश्रम आणि तयारीसह ही भूमिका पार पाडली. चिराग केवळ एक अभिनेताच नाही, तर एक व्यावसायिकही आहे. त्यानं ‘RCSP Hotels & Resorts’ ची स्थापना केली असून, कर्जत इथे ‘The Farmhouse’ नावाचं एक सुंदर ‘लेकफ्रंट रिसॉर्ट’ तो चालवतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Malaika Arora Cosy Moments: पार्टीत नव्या मिस्ट्री मॅनसोबत कोझी झाली मलायका; एकमेकांच्या मिठीत बुडालेले दोघे, 21 वर्षांनी लहान असलेला हा नवा बॉयफ्रेंड?

आणखी वाचा

Comments are closed.