सोन्याचा लोभ… सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे खड्ड्यात पुरले
सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातूनत एक धक्काधायक घटना समोर आली आहे. येथील एका सालगड्याने सोन्याच्या आमिषपोटी आपल्याच शेतमालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृत व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. मोहोळ (Molol) तालुक्यातील यल्लमवाडी या गावात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी शेतमजुरास अटक केली आहे. मयत कृष्णा चामे यांची हत्या आरोपीने एकट्याने केल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याच्यासोबत सह आरोपी आहेत किंवा कसे याबाबत मोहोळ पोलीस (Police) अधिक तपास करीत आहेत.
15 डिसेंबर रोजी कृष्णा नारायण चामे (वय वर्ष 52) हे बेपत्ता असल्याबाबत मोहोळ पोलिसांमध्ये तक्रार प्राप्त झाली होती. याबाबत पोलिसांनी तपास केला असता कृष्णा चाने यांची कोणतीही माहिती मिळत नव्हती. तपासामध्ये चामे यांच्या शेतात सालगडी म्हणून असलेल्या सचिन भागवत गिरी याने एक माहिती दिली. कृष्णा चामे यांना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर नेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी यासंदर्भात बेपत्ताऐवजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील मयत कृष्णा चामे यांचे घर शेतामध्ये फॉरेस्टला लागून आहे. घराच्या आसपास साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत शेती आणि फॉरेनची जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी लोकवस्ती किंवा सीसीटीव्ही सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती. कृष्णा चामे यांचा मोबाईल देखील घरी असल्याने सीडीआरवरील माहितीचा देखील पोलीस तपासामध्ये कोणताही फायदा होत नव्हता. अखेर, पोलिसांनी वेगळ्या मार्गाने तपास करुन सागगड्याला प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर, हा गुन्हा उलगडला.
या प्रकरणातील मयत कृष्णा चामे व त्यांच्या कुटुंबीयांचे बँक स्टेटमेंट आणि इतर लोकांसोबतच्या आर्थिक व्यवहार बाबतीतला अभ्यास पोलिसांनी केला असता कृष्णा चांदणे यांचे अपहरण आर्थिक कारणावरून झाले असल्याचा संशय पोलिसांना आला. त्याचवेळी सालगडी असलेल्या सचिन भागवत गिरी याच्या चौकशी दरम्यान बोलण्यात विसंगती असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सचिन गिरी याची सखोल चौकशी केली असता त्याने स्वतः गुन्हा केल्याची कबुली दिली.
चामे यांच्या अगंवार 18 ते 19 तोळे सोनं
कृष्णा चामे हे अंगावर जवळपास 18 ते 19 तोळे सोने लॉकेट, अंगठ्या, सोन्याचे कडे अशा स्वरूपात वापरत होते. हेच सोने मिळवण्याचे लोभ आरोपी सचिन भागवत गिरी याच्या मनात निर्माण झाले. त्यामुळे त्याने कृष्णा चामे यांच्या डोक्यात सुरुवातीला हातोडेने मारून हत्या केली. त्यानंतर धारदार शस्त्राने शरीराचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉली कॅप कॅरीबॅग मध्ये भरले. आणि घरासमोरील शौचालयाच्या शोष खड्ड्यांमध्ये पुरून ठेवले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर आरोपी सचिन गिरी याने हत्तेची कबुली दिली. दरम्यान, अटक आरोपी सचिन भागवत गिरी यांच्या विरुद्ध धाराशिव जिल्ह्यात यापूर्वी तीन चोरी विषयक गुन्हे दाखल असल्याचे देखील समोर आले आहे. कृष्णा चामे यांची हत्या आरोपीने एकट्याने केल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याच्यासोबत सह आरोपी आहेत किंवा कसे याबाबत मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.