एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर! आक्षेपार्ह कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
गुन्हे बातम्या: रविवारी झालेल्या एटीएसच्या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. महाराष्ट्र एटीएसने तीन दिवसांपूर्वी पुसद (जि. यवतमाळ) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले होते. एटीएसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्च ऑपरेशनदरम्यान पुसद येथे राहणाऱ्या काही मुस्लिम युवकांचे मोठ्या प्रमाणावर रॅडिकलायझेशन (कट्टरपंथी विचारांकडे वळवणे) केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
फुटबॉल खेळणाऱ्या किंवा फुटबॉलप्रेमी मुलांना टार्गेट केले जात होते
मिळालेल्या माहितीनुसार, तपासात असेही उघड झाले आहे की, फुटबॉल खेळणाऱ्या किंवा फुटबॉलप्रेमी मुलांना विशेषतः टार्गेट केले जात होते. पुसद परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम मुले फुटबॉलकडे आकर्षित असून तेथे अनेक फुटबॉल क्लबही कार्यरत आहेत.एटीएसच्या प्राथमिक चौकशीत असेही समोर आले आहे की, काही युवकांना रॅडिकलायझेशनसाठी महाराष्ट्राबाहेरही पाठवण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा नोंदवलेला नसल्याची माहिती आहे. छाप्यादरम्यान एटीएसने तलवारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्यांची सखोल तपासणी सुरू आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान पुसद येथे राहणाऱ्या काही मुस्लिम युवकांचे मोठ्या प्रमाणावर रॅडिकलायझेशन (कट्टरपंथी विचारांकडे वळवणे) केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
कारवाईत अनेक संशयितांना ताब्यात घेतलं आहे
आणखी वाचा
Comments are closed.