मराठा आंदोलनात सक्रिय राहिलेल्या वाळूमाफिया सुयोग साळुंखेवर MPDA कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध

जलना न्यूज: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनात एकेकाळी सक्रिय असलेला वाळू माफिया सुयोग साळुंखेवर त्याचे वाढते गुन्हे लक्षात घेता, जालना जिल्हा प्रशासनाने MPDAचा बडगा उगारत त्याला ताब्यात घेऊन एक वर्षासाठी स्थानबद्ध केलंय. सुयोग साळुंके वर यापूर्वीच एक वर्षासाठी, जालना (Jalna News) संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि बीड (Beed) जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील वाळू चोरी आणि इतर गुन्ह्यात वाढ होत असल्याने पोलिसांनी MPDA चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानंतर आरोपी सुयोग साळुंखेला ताब्यात घेऊन त्याची हर्सूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान इतर अनेक वाळू तस्कर पोलिसांच्या रडारवर असून येत्या काळात आणखी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिलाय.

सरकारी वकिलाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे

दुसरीकडेबीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाने केलेल्या आत्महत्येचा तपास डीवायएसपी नीरज राजगुरू यांच्याकडे सोपविण्यात आलाय. 20 ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच शालीने गळफास घेऊन सरकारी वकील विनायक चंदेल यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख आणि क्लार्क अण्णासाहेब तायडे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय. दरम्यान आता या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्याकडे दिला गेलाय. सरकारी वकिलाच्या आत्महत्येने न्यायालयीन क्षेत्रात खळबळ उडाली होती. आता न्यायाधीश आणि क्लार्क यांच्या अटकेसाठी एक पथक देखील रवाना करण्यात आलंय.

सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर; 41 तलवारी जप्त केल्यानंतर पुन्हा 16 तलवारी जप्त

सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस ॲक्शन मोडवर बघायला मिळत आहेत दोन दिवसांपूर्वी नांदुरा येथे एका इसमाच्या घरातून 41 तलवारी जप्त केल्यानंतर पोलिसांनी काल खामगाव व शेगाव येथे छापा टाकून अनुक्रमे नऊ व सात तलवारी जप्त केल्या आहेत. सण आणि उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी बुलढाणा पोलिसांनी अमली पदार्थ व शस्त्र याविरुद्ध मोहीम उघडली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.