अनंत गर्जेच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार, पालवे-गर्जेंचे नातेवाईक एकमेकांना भिडले, वडिलांची


पंकजा मुंडे यांच्या पत्नीची मुंबईत आत्महत्या राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide news) केली होती. अनंत गर्जे यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांची आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु, गौरी पालवे (Gauri Palve Garje) यांच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी गौरी पालवे गर्जे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील मोहोज देवढे या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अग्निसंस्कार व्हावेत, असा आग्रह धरला.  यावरुन गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यानंतर सध्या गावात तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असून सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. (Mumbai crime news)

डॉ. गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरु असताना तिच्या वडिलांना शोक अनावर झाल. ते सर्वांदेखत धाय मोकलून रडले. याठिकाणी अहिल्यानगरमधील पोलीस उपस्थित होते. या पोलीस अधिकाऱ्यांना गौरी पालवे हिच्या वडिलांनी रडतरडत आर्त विनवणी केली. ‘तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका’, असे गौरीच्या वडिलांनी रडतरडत सांगितले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. सुरुवातीला गौरी पालवे यांच्या नातेवाईकांना अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती नव्हती. त्यामुळे पालवे यांच्या नातेवाईकांना डॉ. गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली. त्यानंतर गौरी पालवे गर्जे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

दरम्यान, रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. अनंत गर्जे याच्यासह त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होऊ शकते. काहीवेळापूर्वीच पोलिसांचे एक पथक अनंत गर्जे यांच्या वरळीतील घरी रवाना झाले आहे. या पथकात काही डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे आता अनंत गर्जे यांच्या घराच्या झाडाझडतीत पोलिसांना कोणता महत्त्वाचा पुरावा सापडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

गौरीशी कडाक्याचं भांडण, अनंत गर्जे घराबाहेर पडला, कार कोस्टल रोडवर असताना मनात संशयाची पाल चुकचुकली अन्…

आणखी वाचा

Comments are closed.