Ashok Kharat: अशोक खरातच्या केबिनमधील खास बनावटीच्या काचा पाहून पोलीस थक्क, नेमकं काय घडलं?

अशोक खरात: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपुष्टात येत असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. शनिवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) अशोक खरात याची तब्बल 10 तास कसून चौकशी केली. त्याच्याविरोधात आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले असून यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे तर दोन गुन्हे हे फसवणुकीचे आहेत. त्यादृष्टीने एसआयटी पथकाकडून अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी एसआयटी पथकाने अशोक खरातच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असणाऱ्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची पुन्हा एकदा तपासणी केली. या कार्यालयाच्या झाडाझडतीचा कालचा तिसरा दिवस होता. यावेळी अशोक खरातच्या कार्यालयातील एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली. अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस थक्क झाले. (Nashik Crime news)

अशोक खरात याने बाहेरुन केबिनच्या आतले दृश्य दिसू नये यासाठी  पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच तो केबिनच्या बाहेर लोकांची गर्दी असतानाही आतमध्ये महिलांवर बिनधास्तपणे लैंगिक अत्याचार करायचा. अशोक खरातच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच (Glass) अतिगडद काळ्या रंगाची आहे. या काचा अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. कितीही प्रयत्न केला तरी या काचेतून बाहेरुन आतले दृश्य दिसत नाही. या काचांचा दर्जा पाहून थोड्यावेळासाठी तपास पथकही थक्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत आज सरकारी वकिलांकडून न्यायालयात माहिती सादर केली जाण्याची शक्यता आहे. अशोक खरात याच्याविरोधात आणखी काही महिलांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एसआयटीकडून (SIT) अशोक खरात याची पोलीस कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते. मात्र, खरातच्या वकिलांकडून त्याला विरोध केला जाऊ शकतो. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहता आज न्यायालय अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवली जाणार का, हे बघावे लागेल.

आतापर्यंतच्या एसआयटीच्या तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती आहे. पोलिसांनी अशोक खरातने नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला होता. यादृष्टीनेही पोलिसांकडून आज न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर केली जाऊ शकते. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय घडणार, याकडे साऱ्याच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती

आणखी वाचा

Comments are closed.