तांब्या घेऊन उभी केली, मिठीत घेतले, छातीवरुन हात फिरवून लैंगिक शोषण केले; अशोक खरातविरोधात आणखी
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. काल (24 मार्च) नाशिक सत्र न्यायालयात खरातविरोधात सुनावणी पार पडली. आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. तसेच पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालाने अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या सुनावणीनंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचा धक्कादायक युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान केला. तसंच अशोक खरात स्वताला सिद्धपुरुष समजायचा असंही वकिलांनी म्हटलं. अशोक खरातच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर आणि 31 जिवंत, तसंच पाच वापरलेली काडतुसं जप्त केलीत. त्यामुळं सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. नरबळी देण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी त्याने या गोळ्यांचा वापर केला का? याचा शोध आता पोलीस घेतायत. महिलेच्या लैंगिक शोषणाावरून सुरू झालेला हा तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान, अशोक खरातवर शिर्डीत आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरात यांनी ४ वेळा केली बलात्काराची तक्रार – (अशोक खरात प्रकरण मराठी बातम्या)
अशोक खरातविरोधात काल पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे. अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. वाच्यता केल्यास दैवी शक्तीने आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकीही दिली. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, म्हणत पीडित तरुणीचे कुटुंब अशोक खरातकडे गेले होते. तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली. यावेळी पीडितेसोबत अशोक खरातने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत काय? (अशोक खरात प्रकरण मराठी बातम्या)
तांब्याच्या ग्लासमधील पाणी पाजून नियंत्रण मिळवत अत्याचार केल्याचा दावा पीडित तरुणीने केला आहे. स्वतःला “महादेवाचा अवतार” असल्याचे सांगत कोणाला काही न सांगण्याची भीती दाखवून अत्याचार केला. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी, वडिलांचा मृत्यू होण्याची घातली अशोक खरातने भीती दाखवली. सुरवातीला शेतात घर कुठे बांधावे, त्याचा मुहूर्त काय हे विचारण्यासाठी आई वडिलांबरोबर तरुणी 2021 मध्ये भोंदू अशोक खरातकडे गेली होती. जागा बाधित आहे, दोन वर्षे घर बांधू नका असे सांगत कुटुंबाला पुन्हा बोलावून अशोक खरात घेत होता. कुठल्या फिल्ड मध्ये शिक्षण घेऊ,चांगली नोकरी कुठे लागेल असा प्रश्न तरूणीने करताच खरातने तिच्या आई-वडीलांना केबीन बाहेर काढले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रारीत म्हटलं आहे. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अशोक खरात अत्याचार करत होता. अशोक खरातच्या दाबवामुळेच त्याचा ऑफीस बॉय नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केल्याचे तरुणीने स्पष्टीकरण दिलं. पीडित तरुणीने याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई न केल्याचे समोर येत आहे. आता अशोक खरातचे नवीन कारनामे समोर आल्यानंतर पीडितेने काल पुन्हा नव्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
मला मिठीत घेतले आणि माझ्या डोक्यावरून, छातीवरून हात फिरवला- (अशोक खरात प्रकरण मराठी बातम्या)
मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पीण्यासाठी दिले ते पाणी प्यायले असता ते मला थोडे बेचव लागले, त्यानंतर त्याने काहीतरी मंत्र बोलून तो ग्लास माझे डोक्यावर ठेवून मला डोळे बंद करायला सांगितले, आणि मला पण तो बोलेल तसे मंत्र बोलायला लावले व माझे पाठीमागे येवून उभे राहीला. त्यानंतर आपोआप माझे डोके जड पडू लागले आणि मी तो सांगेल त्याप्रमाणे वागू लागले. त्यावेळी पहिले त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि माझ्या डोक्यावरून, छातीवरून हात फिरवला आणि बोलला की मी महादेवाचा अवतार आहे, माझेकडे दैवी शक्ती आहे, मी तुझे खुप चांगले करीयर घडवील. फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तु कर असे बोलून मला मंत्र बोलायला लावले. आणि नंतर माझे लैंगिक शोषण केले त्यावेळी मी विरोध केला तर तो मला बोलला की तु जर मला विरोध केला आणि जर कोणाला काही सांगितले तर मी माझेकडील दैवी शक्तीने तुझे आणि तुझ्या घरच्यांचे आयुष्य उध्वस्त करून टाकीन आणि तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यु होईल अशी भिती घातली. त्यामुळे मी घाबरून तो सांगेल त्याप्रमाणे वागले, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.