अशोक खरातची 1500 कोटींची ‘आर्थिक कुंडली’ बाहेर येणार; पोलिसांच्या रडारवर आता ‘तो’ खास सीए!
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास आता त्याच्या आर्थिक साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची आता विशेष तपास पथकाकडून (SIT) आर्थिक नाकेबंदी सुरू झाली आहे. खरातचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणारा त्याचा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आता पोलिसांच्या रडारवर आला असून, त्याच्या चौकशीतून 1500 कोटींच्या मालमत्तेचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने सामान्य लोकांना फसवून आणि लुबाडून कोट्यवधींची माया जमवली आहे. त्याची एकूण मालमत्ता 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खरातच्या या अवाढव्य आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे संबंधित सीएच्या हाती होती. हा सीए केवळ खरातचेच नव्हे, तर ‘शिवनिका ट्रस्ट’च्या आजी-माजी सदस्यांचेही आर्थिक व्यवहार पाहत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एसआयटी आता या सीएकडून खरातची संपूर्ण ‘आर्थिक कुंडली’ हस्तगत करण्याच्या तयारीत आहे.
Ashok Kharat Case Nashik Crime News: शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवर संशयाची सुई
या संपूर्ण प्रकरणात ‘शिवनिका ट्रस्ट’च्या आर्थिक उलाढालीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तपासात समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार:
2018 मधील उलाढाल: अवघी 4 लाख रुपये.
2024 मधील उलाढाल: थेट कोट्यवधींच्या घरात झेप.
अवघ्या 7-8 वर्षांत एका ट्रस्टच्या उत्पन्नात झालेली ही प्रचंड वाढ संशयास्पद मानली जात आहे. हा पैसा नेमका कुठून आला? तो कायदेशीर मार्गाने आला की कोणाला तरी लुबाडून गोळा करण्यात आला? या दिशेने आता एसआयटीने आपला मोर्चा वळवला आहे.
Ashok Kharat Case Nashik Crime News: तपासाचा फास आवळला
अशोक खरातशी संबंधित लोकांची आता पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. खरातकडे असलेली कोट्यवधींची रोकड, बेकायदेशीर जमीन-जुमला आणि सोन्या-चांदीचे दागिने यांचा शोध घेतला जात आहे. सीए आणि त्याच्याशी संबंधित इतर दोन व्यक्तींची चौकशी सुरू झाल्यामुळे, या प्रकरणात काही मोठी नावे समोर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.