कल्पना खरात फरार, लूकआऊट नोटीस जारी; आता SIT चं पथक खरातच्या पत्नीच्या माहेरी पोहोचताच हादरवणार
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) फरार असल्याने आता एसआयटीकडून खरात नातलगांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन यांची पुन्हा एसआयटीकडून चौकशी केली. तसेच कल्पना खरातच्या दोन भावांचीही तपास पथकाने चौकशी करण्यात आली. कल्पना खरात फरार असून एसआयटीचे पथक कल्पना खरातच्या मागावर आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी देखील कल्पना खरात अद्याप मिळून न आल्याने कल्पना खरातविरोधात लूकाऊट नोटीस काढण्यात आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
एसआयटीचं पथक कल्पनाच्या माहेरी पोहोचताच धक्कादायक माहिती- (Ashok Kharat Wife Kalpana Kharat)
कल्पना खरात फरार असल्यामुळे एसआयटी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कल्पनाचे माहेर असलेल्या सिन्नर येथील पाडळी येथे जाऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र माहेरच्यांशी कल्पना ही 16 वर्षापासून संपर्कात नाही, तिला अशोक खरात हा कधीही भेटायला येऊ देत नव्हता, अशी धक्कादायक माहिती नातेवाईकांनी दिली. विवाह झाल्यावर कल्पनाने माहेरशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. भावाला देखील कल्पना कधी भेटायला आली नाही, अशी माहिती तिच्या माहेरच्यांनी दिली. तसेच कल्पनाचे माहेरचे लोक तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह करतात, अशी माहितीही तपासातून समोर आली. (Ashok Kharat Case Nashik)
कल्पना खरातने शिर्डीत शेतकऱ्याची केली फसवणूक- (Ashok Kharat Case)
कल्पना खरातने शिर्डीत एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केली आहे. यासंदर्भात कल्पना आणि अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा एसआयटीकडून चौकशी केली. यावेळी कल्पनाचे दोन भावांची देखील चौकशी एसआयटीने केल्याची माहिती समोर आली आहे. जमीन खरेदीच्या प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना आणि कल्पनाचे भाऊ यांचा देखील आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासा दरम्यान उघडकीस आलं आहे. यामुळे आता खरात प्रकरणांमध्ये अशोक खरातचे संबंधित यांची चौकशी सुरू असताना खरातच्या नातलगांची देखील चौकशी एसआयटीकडून केली जात आहे. अशोक खरात पती-पत्नी चौकशी दरम्यान नातलग देखील आता एसआयटीच्या फेरीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
शिवनिका संस्थानच्या तीन संचालकांची चौकशी- (Ashok Kharat Shivnika Sansthan)
अशोक खरात प्रकरणांमध्ये खरातच्या इशान्येश्वर मंदिराचे शिवनिका संस्थानवरील तीन संचालकांची SIT कडून चौकशी करण्यात आली. अशोक खरातचे आर्थिक संबंध असलेल्या शिवनिका संस्थानवरील संचालकांची SIT कडून अशोक खरातच्या समक्ष चौकशी करण्यात आली. अशोक खरातने महिलांच्या लैंगिक शोषणसह आर्थिक फसवणूक करत मोठी माया जमवल्याची SIT कडे माहिती आहे. शिवनिका संस्थांनचे तीन संचालक अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार असल्याचे SIT कडे पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातने भक्तांना देवाच्या पूजा विधीच्या नावाने लाखोंना गंडवल्या प्रकरणी SIT कडून शिवनिका संस्थानच्या संचालकांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.