सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत र

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांच्या गेल्या काही दिवसांच्या तपासात अशोक खरात (Ashok Kharat) हा त्याच्याकडील 20 फुटी सापाचा उपयोग करुन त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांचे डोळे दिपवून टाकायचा, अशी माहिती समोर आली होती. मात्र, हा 20 फुटी सर्प (Snake) खोटा होता, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने तो ऑपरेट केला जात असे. मात्र, ही बाब खरातकडे येणाऱ्या भक्तांना माहिती नसल्याने ते या भोंदूबाबाच्या चमत्काराने भारावून जायचे. (Nashik Crime news)

अशोक खरात याला काल न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी नेमका हाच मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी अशोक खरातच्या चेहऱ्यावर काहीसे गांगरल्याचे भाव होते. संपूर्ण सुनावणी सुरु असताना अशोक खरात हा मान खाली घालून एकटक आपल्या हाताच्या बोटाकडे पाहत होता. सरकारी वकिलांनी 20 फुटी सर्प आणि वाघाचा मुद्दा उपस्थित करताच तो काहीसा चपापला. पाच दिवसांची कोठडी सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी अशोक खरात याला तुम्हाला काही बोलायचे आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी अशोक खरात याने 20 फुटांच्या सापाबाबतचा आरोप साफ धुडकावून लावला. मला साप, वाघ या विषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरात कधीतरी जायचो. त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्र श्रावणी सोमवारी आशा वेळी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं दिली, असे उत्तर अशोक खरात याने दिले. सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या 7 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे यु्क्तिवाद ऐकून न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

फिर्यादी कोण आहे? (अशोक खरात नाशिक सत्र न्यायालय)

  1. कॉस्मोलॉजीचा मला अभ्यास होता असे अशोक खरात सांगत होता. त्याच्याकडे काही सर्टिफिकेट सापडले आहेत.
  2. 6 लाख 53 हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे.
  3. अशोक खरात याच्याकडे 31 काडतुसे त्यात 5 फायर झाले ते कुठे फायर झाले? नरबळी दिलाचा संशय आहे.
  4. अशोक खरात हा 67 वर्षाचा आहे. तो 30 वर्षांच्या मुलींसोबत लैंगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते.
  5. पिस्तुलातील पाच गोळ्या गायब झाल्याने नरबळी दिल्याचा संशय आहे.
  6. वाघ, साप, नाग दाखवत होता ते कुठून आणले? जिवंत होते की नकली? त्याचा शोध घ्यायचा आहे.
  7. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली, त्याची हत्या केल्याचा संशय आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे.
  8. फॉरेस्ट अॅक्ट लागू शकतो. 7 दिवस पोलीस कोठडी द्यावी, व्याप्ती मोठी आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Case Nashik Crime News: लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर काय काय करायचा?, हादरवणारी माहिती

आणखी वाचा

Comments are closed.