150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?,
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्यात आलं आहे. एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. यादरम्यान, पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह (Ashok Kharat HIV Test) आली आहे. भविष्य सांगण्याचा बहाण्याने अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे, नाशिक पोलिसांत दाखल झालेल्या 8 गुन्ह्या पैकी 7 गुन्हे महिला अत्याचार संदर्भात आहे. गुन्हा दाखल केलेल्या महिला व्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाही. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पिढीत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्हाशी सबंधीत सर्व बाजूचा विचार करून तपास करत आहेत. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
मोबाईलमधील महत्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागणार- (Ashok Kharat Case)
अशोक खरातचा मोबाईल तपास पथकाने ताब्यात घेत मोबाईलमधील डेटा रिकव्हर करत महत्वाचे पुरावे पथकाला मिळणार असल्याची माहिती आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरातची महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. SIT कडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात याचा मोबाईल देखील SIT ने जप्त केला आहे.
अशोक खरात व्हॉटसअपवर व्हॉईस मॅसेजने संपर्क करत होता- (Ashok Kharat Case)
भोंदू अशोक खरात हा व्हॉटसअपवर व्हॉईस मॅसेजने संपर्क करत होता अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जात असल्याची माहिती मिळाली असून.मोबाईलमधील काही मॅसेज डिलिट झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशोक खरातचा मोबाईलमधील डेटा एसआयटी पथक, सायबर पोलिस तसेच सायबर एक्स्पर्टकडून रिकव्हर केला जात असून या तपासात खरात कोणाच्या दैनंदिन संपर्कात होता.आणि व्हाइस टायपिंगमधून काही महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. अशोक खरातचे दैनंदिन संपर्कात कोण कोण होते? त्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यानंतर अनेकांचे नाव आणि संभाषण एसआयटी पथकाला मिळणार असल्याची शक्यता आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.