Silent मोड, प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांनी सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला पीडितेवर बलात्कार तसेच तिचा गर्भपात घडवून आणल्यापक्ररणी सात दिवसांची पोलीस कोठडी मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एन. ईचपुरानी यांनी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल सुनावणी पार पडली. या सुनावणीत सरकारी वकिलांनी केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक होते. यानंतर न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलील कोठडी सुनावली. (Ashok Kharat Case Nashik)
सदर प्रकरणातील तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे आणि आरोपी अशोक खरातचे वकील सचिन भाटे यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी अशोक खरात मास्टरमाईंड आहे. तो तपासात सहकार्य करत नाहीय, अशी माहिती सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयाला सांगितली. न्यायालयात जेव्हा जेव्हा सुनावणी झाली, त्यावेळी एसआयटीने अशोक खरात चौकशीत सहकार्य करत नसल्यचं सांगितलं. याचसाठी एसआयटीने आता अशोक खरातच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातचन सायलेंट मोड, स्ट्रॅटेजिस्ट? (अशोक खरात प्रकरण नाशिक)
आतापर्यंत झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नालाही अशोक खरातने नाही असे एका शब्दात उत्तर दिले. पण अशोक खरातचा हाच सायलंट मोड चर्चेचा विषय बनला आहे. अशोक खरातच्या या भूमिकेवर आता कायदेतज्ज्ञांने मत व्यक्त केलं आहे. आरोपी अशोक खरातने विचारलेल्या कोणत्याही मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्यास एसआयटी त्या दिशेने अधिक सखोल चौकशी सुरु करु शकते. त्यामुळे अशोक खरातने मौन राखणे पसंत केले आहे. अशोक खरातची ही आखलेली रणनीती असू शकते, अशी माहिती कायदेतज्ज्ञांनी दिली.
पंतसंस्थेच्या अनेक खात्यांमध्ये खरात वारसदार- (Ashok Kharat Case)
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.