वनखात्याने घर पाडल्यानंतर खोक्या भाईची बहीण आक्रमक, संतापून म्हणाली, आम्हाला न्याय द्या!
बीड: वनखात्याच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या घरावर बुलडोझर चालवण्यात आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सतीश भोसले (Satish Bhosale) याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी. पण आमचे घर पाडणाऱ्यांवरही सरकारने कारवाई करावी. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सतीश भोसले (Khokya Bhai) हिच्या बहिणीने केली. त्या शुक्रवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सतीश भोसले माझा भाऊ आहे. मी आतापर्यंत या प्रकरणात काही बोलले नव्हते. जी काही चौकशी सुरु आहे, ती आम्ही मोबाईलवर पाहत आहोत. यामध्ये खरं काय खोटं काय, आम्हाला माहिती नाही. आम्हाला पोलिसांची कायेदशीर चौकशी मान्य आहे. पण बुलडोझरने आमचे घर पाडणे योग्य नव्हते. आमचं घर पाडल्यानंतर चार-पाच दिवसांनी ते पेटवून देण्यात आल्याची बातमी समोर आली. त्यामुळे आम्ही आज इतक्या तातडीने शिरुर-कासार या गावात आलो. घर पेटवून देताना घरातील लहान मुलींनाही मारण्यात आले, त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता सरकारने आम्हाला न्याय मिळून द्यावा, अशी मागणी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बहिणीने केली.
सतीश भोसलेची 7 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी
सतीश भोसले याला बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत 12 फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर खोक्याभाई याला प्रयागरा येथून प्रथम छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. तिथून सतीश भोसले याना सुनावणीसाठी बीडच्या शिरुर येथे नेण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करुन आज त्याला न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सतीश भोसले याला 20 तारखेपर्यंत म्हणजे सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सतीश भोसले याला कोर्टातून पुन्हा शिरर-कासार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. थोड्याचवेळात त्याला पोलीस कोठडीत पाठवल्याची प्रत जारी केली जाईल.
खोक्या भाई हा गेल्या दोन दिवसांपासून ट्रान्झिस्ट रिमांडमध्ये होता. आता बीड पोलिसांना त्याची कोठडी मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने त्याची चौकशी सुरु होणार आहे. या चौकशीत खोक्या भाई कोणत्या गोष्टी पोलिसांना सांगणार, या सगळ्याचे धागेदोरे भाजप आमदार सुरेश धस यांच्यापर्यंत पोहोचणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पुढच्या सुनावणीला पोलीस कोर्टात काय माहिती देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=ottugh3wbjg
आणखी वाचा
खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवला, घर पाडलं; वनविभागाची मोठी कारवाई
अधिक पाहा..
Comments are closed.