प्रेमसंबंधातून तरुणाला संपवलं, बीड पोलीसांची चक्रे फिरली, मुलीच्या वडिलांसह भाऊ अन् चुलत्याला अ

बीड गुन्हा: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे प्रेमसंबंधातून घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात मुलीचे वडील, भाऊ आणि चुलते अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

काय घडलं होतं नेमकं?

गंगावाडी गावातील शिवम काशिनाथ चिकणे (वय 21) या तरुणाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे रागाच्या भरात शिवमला मुलीच्या भावाने इतर नातेवाईकांच्या मदतीने बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान शिवमच्या डोक्यावर गंभीर मार लागला होता. जखमी अवस्थेत त्याला तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवमच्या नातेवाईकांनी आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पाऊण तास मृतदेह गेवराई पोलीस ठाण्याबाहेर ठेवून ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर तपासाला गती मिळाली आणि तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या पूर्णतः पूर्वनियोजित आणि सूडबुद्धीतून झाल्याचं समोर येत आहे.

नेमकं काय घडलं होतं?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावात प्रेमसंबंधामुळे झालेल्या मारहाणीत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवत जोरदार आंदोलन केलं. तब्बल पाऊण तास मृतदेह तलवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठेवण्यात आला होता. यावेळी नातेवाईकांनी “आरोपींना अटक करा, न्याय द्या” अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणात मुलीच्या वडिलांना भावाला आणि चुलत्याला अटक करण्यात आली आहे. मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

हेही वाचा

Beed Crime: गेवराईत प्रेमसंबंधातून केलेल्या मारहाणीत तरुण दगावला, मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले, नेमका प्रकार काय?

आणखी वाचा

Comments are closed.