दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळं सांगितलं
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली. नातेवाईकाच्या घरी गेला होता तिथून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नानं दत्तात्रय गाडेला अटक करण्यात यश आलं आहे. दत्तात्रय गाडेला बाहेर येण्यासाठी आवाहन केलं होतं, त्यानंतर तो सापडल्याचं गुनाट गावच्या पोलीस पाटलांनी सांगितलं.दत्तात्रय गाडे पाणी मागण्यासाठी येऊन गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात गस्त घालत,डॉग स्कॉडच्या मदतीनं त्याच्या अटकेची कारवाई पूर्ण केली.
दत्तात्रय गाडे उसाच्या शेतात लपल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला अटक केली. गाडे रात्री बाराच्या सुमारास गावातील नातेवाईकाच्या घरी पाणी पिण्यासाठी आला होता. त्याला भूक लागली होती. तिथं दत्तात्रय गाडेनं जे काय केलं, त्याचा पश्चाताप झाल्याचं म्हटलं. याशिवाय गाडेनं प्रचंड भूक लागली असून काही तरी खायला द्या असं सांगितलं. नातेवाईकांनी काही खायला न देता फक्त पाण्याची बाटली दिली. त्यानंतर गाडे त्या घरातून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी यासगळ्या घटनाक्रमाची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांची पूर्ण टीम अॅक्टिव्ह झाली, डॉग स्कॉड आलं, 13 टीम तैनात झाल्या. दत्तात्रय गाडे दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. उसात जाऊन पोलिसांनी गाडेला अटक केली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर तपासाची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
दत्तात्रय गाडे तीन दिवस गुनाटमध्येच
मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे यानं स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट या गावी गेला होता अशी माहिती आहे. पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या अटकेच्या कारवाईत गुनाट गावच्या नागरिकांनी यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली असल्याचं सांगितलं. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला जिथून अटक केली तिथं काही कपडे आणि गोधडी देखील आढळून आल्याची माहिती आहे.
दरम्यान, दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनला त्याचा जबाब नोंदवून घेतला जात होता. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. दत्तात्रय गाडेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून त्याला सकाळी 11 वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल.
https://www.youtube.com/watch?v=P6KJ4DWGLAU
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.