गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण, हत्येचाही प्रयत्न; आरोपी शरद पवारांच्या
Gopichand Padalkar कामगार शार्नू हँड: सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे. अपहरणची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होते. काल रात्री 10 च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरणु हांडे (Gopichand Padalkar Worker Sharnu Hande) असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहेत. तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
संशयित आरोपी हा अमित सुरवसे यांने यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्याचबरोबर अमित सुरवसे हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सोलापूर शहर पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचा जीव थोडक्यात वाचला. रात्री 10 च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी शरणु हांडे हा गंभीर अवस्थेत असल्याचे पोलिसांना लक्षात आल्याने त्याला तात्काळ सोलापुरात आणण्यात आलं आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर हे या प्रकरणात पोलिसांची आणि जखमी कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी सोलापुरातं सकाळी येणार असल्याची माहिती आहे.
अपहरण करण्यामागचं धक्कादायक कारणही समोर-
आरोपी अमित सुरवसे याने 2021 साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. याचा बदला म्हणून काही दिवसांपूर्वी शरणु हांडे याने अमित सुरवसे याला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर शरणु हांडे आणि अमित सुरवसे यांनी वाद मिटवून घेतला होता. पण अमित याने याच मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्राच्या मदतीने शरणु याचे अपहरण केले. यासाठी त्याने सुरुवातीला पुण्यातून भाड्याने कार घेतली. मित्रासह तो सोलापुरात आला आणि शरणु हांडे याला घराजवळून शास्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं.
अमित सुरवसेसह अन्य 6 आरोपींवर हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा-
शरणु याचे अपहरण करून हत्येच्या उद्दिष्टाने अमित आणि त्याचे मित्र हे कर्नाटकचे दिशेने निघाले होते. अपहरणची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होते. रात्री 10 च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदाराना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी शरणु हांडे हा गंभीर अवस्थेत असल्याचे पोलिसांना लक्षात आल्याने त्याला तात्काळ सोलापुरात आणण्यात आलं आहे. तर आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आलीय. या धक्कादायक प्रकरणात पोलिसानी आरोपी अमित सुरवसेसह अन्य 6 आरोपींवर हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.