सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्र फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं
केतन अग्रवाल लोहगड प्रकरण पुणे : राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात मुख्य संशयित सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांना काल (29 जून) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी आणखी सात दिवस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Ketan Agrawal Lohagadh Case Pune)
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता सियाचा भाऊ साहिल गोयलभोवती आता पुढचा तपास फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रिकेट खेळताना आधी चेतन आणि साहिलची मैत्री झाली. ही कबुली साहिलने स्वतः दिलीये. पुढं साहिलसोबत सिया मॅच बघायला गेली अन तिथून चेतन तिचा मित्र बनला. पुढं या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यामुळं सिया-चेतनच्या लव्ह स्टोरीबाबत साहिलला पूर्वकल्पना होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सिया-चेतनची लव्हस्टोरी सुरु झाली आणि मध्येच केतनची एन्ट्री झाली. फेब्रुवारीत साखरपुडाही झाला. मात्र तिला केतनशी लग्न करायचं नव्हतं, हे सियाने साहिलला सांगितलं होतं. तसंच बालीला प्री विडिंग शूटला जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यावर सिया आणि साहिलमध्ये भांडणही झालं होतं का असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. (Ketan Agrawal Lohagadh Case Pune)
केतनशी सियाला लग्न करायचं नाही, हे साहिलला आधीचं माहिती होतं- (Ketan Agrawal Lohagadh Case Pune)
पुढं फूड मॉल वर सियाने केतनचा पासपोर्ट फाडून टाकला, मुंबई विमानतळावर पोहचल्यावर केतनला पासपोर्ट सापडला नाही. आता केतनशी सियाला लग्न करायचं नाही, हे साहिलला आधीचं माहिती होतं, मग केतनचा पासपोर्ट गायब झाल्यावर, तो सियाने गायब केलाय, ही शंका साहिलच्या मनात आली असेल का? जर शंका आली असेल तर ती शंका साहिलने उपस्थित का केली नसावी?, असा सवाल उपस्थित होत आहे.
कुटुंबीयांनी परवानगी नाकारूनही 12 दिवसांत 4 वेळा सियाने लोहगडला जाण्याचा आग्रह धरला- (Ketan Agrawal Lohagadh Case Pune)
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. लोहगडावरून केतनला ढकलून देण्यासाठीच सियाचा तिथे जाण्याचा हट्ट होता का, असा सवाल अग्रवाल कुटुंबीयांनी पोलीस तक्रारीत उपस्थित केलाय. कुटुंबीयांनी परवानगी नाकारूनही 12 दिवसांत 4 वेळा सियाने लोहगडला जाण्याचा आग्रह धरला. केतनला पर्वतरांगांमध्ये फिरण्याची आवड असल्याचा फायदा सियाने घेतला, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान 30 मे रोजी पहिल्यांदा परवानगी मिळाली, पण 4 जूनला नाकारल्यावर सियाने आकांडतांडव केला. अखेर 18 जूनला वाढदिवसाचं कारण देत तिनेच केतनला किल्ल्यावरून ढकललं, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
संबंधित बातमी:
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Comments are closed.