समलैंगिक संबंध ठेवताना मुंबईतील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पार्टनर मोबाईल घेऊन पळाला, पोलिसांन

मुंबई क्राइम न्यूज मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समलैंगिक संबंध (homosexual relationships) ठेवताना 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एल.टी.मार्ग पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा नोंदवत निष्काळजीमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी पार्टनरला अटक देखील केली आहे.

समलैंगिक संबंध ठेवताना 55 वर्षीय व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला. त्यावेळी त्याला त्याच अवस्थेत सोडून 33 वर्षीय तरुण बेशुद्ध व्यक्तीचा मोबाइल घेऊन पळून गेला. काळबादेवी परिसरात घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचरण केले. त्यावेळी हा प्रकार समोर आला.

मृताजवळचे दोन्ही मोबाईल न मिळाल्याने पोलिसांना आला संशय-

पोलिसांना सुरुवातीला 55 वर्षीय व्यक्तीचा अकस्मित मृत्यू झाल्याचे वाटले. मात्र मृताजवळचे दोन्ही मोबाईल मिळून न आल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या दोन्ही मोबाइलचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर बोरिवलीतून 33 वर्षी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

https://www.youtube.com/watch?v=Un3xgkcmc68

संबंधित बातमी:

Crime News: गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं; शीर, हात, पाय कटरने कापून पोत्यात भरले!

अधिक पाहा..

Comments are closed.