मुलावर तीन जणांनी केला अत्याचार; दोन आरोपी अल्पवयीन, मुंबईतील धक्कादायक घटनेनं खळबळ
मुंबई क्राइम न्यूज मुंबई: निर्जनस्थळी नेऊन 10 वर्षांच्या मुलावर तीन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना (Mumbai Crime News) मुंबईतील चुनाभट्टी येथे घडली आहे. पीडित मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असून त्या अल्पवयीन मुलांची शनिवारी डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर 18 वर्षीय तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ११५ (२) व ३(५) सह पोक्सो कायदा कलम ६ व १० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
नेमकं काय घडलं?
पीडित मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे त्याला फसवून तिघांनी चुनाभट्टी येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्यांनी अल्पवयीन मुलावर अत्याचार केला. घटनेनंतर मुलगा परत घरी आल्यानंतर तो घाबरलेला होता. त्यानंतर त्याचे आईने विचारणा केली असता, मुलाने घडलेला प्रकार आईला सांगितला.
मुंबई उपनगरातील मानखुर्द परिसरात एका लहान मुलाच्या अंगावर एका विकृत व्यक्तीने पिटबुल कुत्रा सोडल्याची घटना समोर आली आहे. या कुत्र्याने मुलाचा चावा (Dog attack) घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे. केवळ विकृत आनंद मिळवण्यासाठी मालकाने मुलाच्या अंगावर कुत्रा सोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. याबाबत मुलाने त्याच्या वडिलांना माहिती दिली असता त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये मोहम्मद सोहेल हसन खान याच्याविरोधात बीएनएसच्या कलम 35 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सौहेल हसन खान हा तिथलाच स्थानिक रहिवासी असून एसी दुरुस्तीचे काम करतो. माझ्यावर कुत्र्याने हल्ला केल्यावर मोहम्मद सोहेल हसत होता, असे हमजा खान याने सांगितले. आम्ही खेळत होतो, तेव्हा तो पिटबुल घेऊन आला. सगळे जण घाबरून पळाले, पण मी अडकलो. कुत्रा मला चावला, माझे कपडेही फाटले. हे सगळं पाहताना कुत्र्याचा मालक हसत होता, असे हमजा खान याने पोलिसांना सांगितले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.