पंकजा मुंडेंसोबत असताना गौरीचा फोन आला, म्हणाली, मी आयुष्य संपवतेय, अनंत गर्जे धावत घरी गेले अन


पंकजा मुंडे यांच्या पत्नीची मुंबईत आत्महत्या राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide news) केली. वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गौरी पालवे- गर्जे (Gauri Palve Garje) यांनी गळफास लावून घेतला. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे (Anant Garje) आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे यांच्या दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गौरी पालवे यांना समजले होते. त्यामुळे अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांच्यात भांडणे व्हायची. याच वादातून गौरी पालवे यांनी शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आयुष्य संपवले. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गौरी पालवे यांचे पती अनंत गर्जे, दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल गर्जे या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai crime news)

गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. गौरी हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय गौरीच्या माहेरच्या मंडळींनी बोलून दाखवला. परंतु, अनंत गर्जे यांनी याबाबत वेगळाच दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, गौरीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवरुन माझ्याशी संपर्क साधला होता. मी आत्महत्या करत असल्याचे तिने मला सांगितले. त्यावेळी मी पंकजा मुंडे यांच्यासोबत दौऱ्यावर होतो. गौरीचा फोन आल्यानंतर मी तातडीने दौरा रद्द करुन घरी परतलो. तोपर्यंत गौरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मी घरी गेलो तेव्हा तिने दरवाजा उघडला नाही. मी 31व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून 30 व्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्या खिडकीत उतरलो. तेव्हा खिडकीतून मला गौरीचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. यानंतर आम्ही गौरीला तातडीने नायर रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असा दावा अनंत गर्जे यांनी केला होता.

Pankaja Munde PA wife Suicide: गौरी सुसाईड करतेय, तिला समजवा…

अनंत गर्जे आणि गौरी पालवे- गर्जे हे दोघे गेल्या महिन्यातच वरळीत भाड्याने राहण्यास आले होते. गौरी पालवे-गर्जे यांचा दीर अजय हादेखील त्यांच्यासोबत राहायचा. शुक्रवारी रात्री अनंत गर्जे यांनी त्यांच्या सासऱ्यांना फोन केला होता. याबाबत माहिती देताना गौरी पालवे-गर्जे यांच्या वडिलांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता अनंतचे दोन मिस कॉल वडिलांना आले होते. त्यांनी पुन्हा कॉल केल्यावर अनंतने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर गौरीकडे चौकशी केली असता तिने सर्व ठीक असल्याचे सांगितले. परंतु, शनिवारी संध्याकाळी पावणेसात वाजता अनंतने वडिलांना पुन्हा कॉल करुन, ‘गौरी सुसाइड करतेय तिला समजवा’, असे म्हटले. वडिलांनी गौरीकडे फोन द्यायला सांगताच अनंत गर्जे यांनी तिला दवाखान्यात घेऊन जातोय, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर रात्री आठ वाजता नायर रुग्णालयात गौरी पालवे-गर्जे यांना मृत घोषित करण्यात आले.

या सगळ्या प्रकारानंतर गौरी पालवे यांच्या माहेरच्या कुटुंबाने अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौरीला अनंत गर्जे यांच्या अनैतिक संबंधांबाबत माहिती होते. अनंत गर्जे आणि त्याचे कुटुंबीय गौरीला  टॉर्चर करायचे.  अनंतने फोन कॉलवर गौरी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. मग त्याने गौरीला गळफास घेण्यापासून थांबवले का नाही?, असा सवाल गौरीच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

आणखी वाचा

गौरीशी लग्न होऊनही विवाहबाह्य संबंध, लातूरच्या हॉस्पिटमधील गर्भपाताच्या संमतीपत्रावर अनंत गर्जेंचा नवरा म्हणून उल्लेख, ‘ती’ कागदपत्रं पाहून गौरीच्या पायाखालची जमीन सरकली

आणखी वाचा

Comments are closed.