निर्माल्य टाकण्यासाठी थांबले, दोघांनी सेल्फी काढला; अचानक बायकोने पूलावरुन उडी मारली, नवऱ्यासमो
नागपूर न्यूज नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवरील नेरी पुलावर घडलेल्या एका विचित्र घटनेने खळबळ उडाली आहे. पतीसोबत नदीत निर्माल्य विसर्जनासाठी आलेल्या पत्नीने नदीत उडी घेतली. या घटनेत सदर महिलेचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन जात असताना एका दाम्पत्याने निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली. निर्माल्य विसर्जनानंतर पती-पत्नी दोघांनी सेल्फी काढली, पतीने पत्नीचा फोटोही काढला. त्यानंतर 23 वर्षीय महिलेने अचानक पुलावरून नदीत उडी मारली. त्यामुळे पती काहीच करू शकला नाही. पुलावरून खाली उतरून नदीपात्रपर्यंत धाव घेतली तोपर्यंत पत्नीचा बुडून मृत्यू झाला होता. मृत महिलेचे नाव ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय 23) असून ती नागपूर जिल्ह्यातील काचुरवाही गावाची रहिवासी होती. सध्या ती नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरेसोबत राहत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी साकोरे दाम्पत्य कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते. या दरम्यान कार कन्हान नदीच्या नेरी पुलावर आली असता निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली आणि त्यानंतर दोघांनी सोबत काही वेळ त्या पुलावर घालवला. या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील घेतला. मात्र, काही क्षणात ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली. हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना जबर धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र जवळपास कुणीही नसल्याने कुठलीही मदत मिळू शकली नाही.
ज्ञानेश्वरीने एवढं मोठं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं?
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणात ज्ञानेश्वरीने एवढं मोठं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं? आणि त्यामागील सत्य काय? हे अद्याप कळू शकलेलं नाही. सध्या पोलीस त्या दिशेने तपास करत आहे. मात्र या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असावे, अशी चर्चा आहे. सध्या पोलिसांनी विजय साकोरे याचाही जबाब नोंदवला असून पुढील तपास कामठी पोलीस करत आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.