पुण्यात पत्नीला शिलाई मशीनच्या कात्रीने संपवलं, रक्ताने माखलेल्या हातांनी पती स्वत: पोलिसात हजर
गुन्हे बातम्या ठेवा: पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. शिलाई मशीनच्या कात्रीने पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पती स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला आहे. बुधवारी पहाटे खराडीतील तुशजाभवानी नगर परिसरात ही घटना घडली आहे. ज्योती गिते असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर शिवदास गिते असं आरोपी पतीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शिवदास गितेला अटक केली आहे. शिवदास गिते हा मूळचा बीडचा असून, न्यायालयात टंकलेखक आहे. खडकी भागात तो भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता. काही दिवसांपासूनम हा दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरुन वाद सुरु होता. बुधवारी पहाटे देखील या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पती शिवदास गिती याने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नी ज्योती गिते यांच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांना धाव घेतली. त्यानंतर खराडी पोलिसांनी ज्योती गिते यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच ज्योती गिते यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या घटनेचा अधिकचा तपास सुरु आहे.
आरोपीने व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणत आहे?
दरम्यान, आरोपी पतीन शिवदास गिते याने या प्रकरणी माहिती देणारा व्हिडीओ देखील शूट केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला माराव किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माराव लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत.
2016 मध्ये ज्योती आणि शिवदासचं झालं होतं लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये ज्योती (27) ने शिवदास गिते (37) याच्याशी लग्न केले होते. हे दाम्पत्य मूळचे बीडचे असून पुण्यातील खराडी भागात वास्तव्यास होते. या दाम्पत्याला 5 वर्षाचा अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा होता. ज्योती शिलाई मशीनद्वारे कपडे शिवण्याचे आणि धुणे भांड्यांची कामं करत होती. तर दुसऱ्या बाजूला शिवदास गिते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे स्टेनो म्हणून कार्यरत आहे. शिवदास हा तिच्या पत्नीवर अनेक वेळा तिच्या चारित्रावर संशय घेत होता आणि यातून त्यांच्यात अनेक वेळा भांडण होत होते.
चंदननगर पोलिस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, 15 जानेवारीला झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी केले होते. परीक्षा परत देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदासला सांगत होती. 22 जानेवारी रोजी जेव्हा ज्योतीचे तिच्या बहिणीसोबत बोलणे झाले तेव्हा तिने शिवदास हिला त्रास देत असल्याचे ज्योती ने सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी पावणे सात वाजता ज्योती तिच्या पतीला परीक्षांचे अभ्यास करण्यास सांगत होती याचा राग आल्याने शिवदास याने शिलाई मशीनवर वापरण्यात येणाऱ्या कात्रीने त्यांच्या मुलाच्या समोर ज्योतीची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नाहीतर त्याने खून केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योतीचा व्हिडिओ सुद्धा काढला. यानंतर शिवदासने स्वतः पोलिस ठाण्यात हजेरी देऊन हा सगळा घटनाक्रम सांगितला. चंदननगर पोलिस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे
महत्वाच्या बातम्या:
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्…! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
अधिक पाहा..
Comments are closed.