‘थार’पासून बलेनो गाडीपर्यंत, 7 दिवसांत गाठली 11 ठिकाणं; राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?
Rajendra Hagawane Arrested Vaishnavi Death Case: वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death Case) आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला (Rajendra Hagawane) अटक केली आहे. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेलालाही अटक झाली.वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज (23 मे) पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केलीय. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली.
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनूसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, याबाबत माहिती समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांत वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे फिरत होता. त्यामुळे राजेंद्र हगवणेंच्या या प्रवासावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहे. 17 मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तर त्याला त्यावेळी त्याला अटक का झाली नाही?, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच राजेंद्र हगवणे 22 मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचं पोलीस रेकॉर्डद्वारे समोर आलं आहे.
राजेंद्र हगवणेचा 17 मे ते आज पहाटेपर्यंतचा प्रवास-
17 मी-
– औंध हॉस्पिटल
– मुहूर्त लॉन्स (थार गाडीने)
– वडगाव मावळ
– पवना डॅम (फार्म हाऊस)
– आळंदी येथे लॉजवर
18 मी-
– वडगाव मावळ
– पवना डॅम (बंडू फाटक कडे बलेनो गाडीने)
19 मी-
– पुसेगाव ( सातारा) अमोल जाधव यांच्या शेतावर
19 मे आणि 20 मे-
पसरणी मार्गे कोगनोळी (हॉटेल हेरीटेज)
21 मी-
कोगनोळी ( प्रीतम पाटील यां मित्र्याच्या शेतावर)
22 मी-
पुण्याला परत
वैष्णवीच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हादरला-
वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.
https://www.youtube.com/watch?v=L7h1hfic5-i
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.