न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताच वाल्मिक कराडने मोठा निर्णय घेतला; उज्जवल निकम यांनी जोरद

संतोष देशमुख केस मणी: सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Death Case) यांच्या हत्या प्रकरणात आज (22 जुलै) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वाल्मिक कराडचा (Walmik Karad) दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. तसेच आता पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.

मागील झालेल्या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत युक्तिवाद झाला होता. विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी त्याला जोरदार विरोध केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी झाली. यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या संपत्ती अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे.

आज सुनावणीत काय काय घडलं?, उज्जवल निकम यांनी सर्व सांगितलं-

वाल्मिक कराडने संतोष देशमुखांच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावं. याबाबत अर्ज दिला होता. तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. अर्ज फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे दोषमुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला. तसेच वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असा देखील अर्ज केला. त्यावर देखील आम्ही आमचे म्हणणे मांडून विरोध केला आहे. आज न्यायालयात ड्राफ्ट चार्ज करून वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदारा विरोधात वेगवेगळ्या कलमाखाली 12 ते 13 आरोप निश्चित केले जावे असा विनंती अर्ज केला आहे. या अर्जाची सुनावणी पुढे होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी जे दोष मुक्तीचे अर्ज केले आहेत ते उशिरा दाखल केले आहे. आरोप पत्र दाखल केल्यानंतर दोन महिन्यात अर्ज करणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तो अर्ज केला नव्हता. न्यायालयाने अर्ज फेटाळावे अशी देखील आम्ही मागणी केली आहे. आता 4 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे, अशी माहिती उज्जवल निकम यांनी दिली.

वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले?

वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर उच्च न्यायालयात दाद मागणार, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे म्हणाले. वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले. तर वाल्मीक कराडचा जामीन अर्ज देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सर्व आरोपींच्या वकिलांकडून दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. संपत्ती जप्तीबाबत दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला. आम्ही जे बँक खाते गोठवण्यात आले. त्यावरील निर्बंध उठविण्याबाबत बाजू मांडली. याबाबत सुनावणी झाली. पुढील तारखेला याबाबत न्यायालय निर्णय देईल, असं विकास खाडे यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=nw1mtvaqq4o

संबंधित बातमी:

Walmik Karad : वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये भयंकर प्रकार, कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाला चिरलेला रबरी बॉल; पोलिसांनी झाडाझडती घेतली अन्…

आणखी वाचा

Comments are closed.