सोलापुरातील उपसरपंचाने आयुष्य संपवलं, कला केंद्रातील नर्तिकेवर संशय, बंगल्यासाठी अडून बसली अन्.

सोलापूर क्राइम न्यूज: सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासुर गावात एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा मृतदेह एका कारमध्ये सापडला होता. या प्रकरणी मृताच्या मेहुण्याने पोलिसात फिर्याद दिली असून कला केंद्रात (Kala Kendra Dancer) काम करणाऱ्या एका नर्तिकेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. पूजा गायकवाड असे 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे.

मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कलाकेंद्राट गोविंद यांची नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेऊन तिने गोविंदसोबत प्रेमसंबंध ठेवले. वेळोवेळी पूजाने गोविंद बर्गे यांच्याकडून पैसे, जमीन, सोनेनाणे घेतले. मात्र, काही दिवसांपासून ती गेवराई येथील बंगला माझ्या नावावर करा, भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्यासाठी दबाव टाकत होती. असे नाही केल्यास तुमच्याशी बोलणार नाही. तुझ्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी नर्तिका पूजा गायकवाड देत होती. यासाठी तिने वारंवार तगादा लावल्याने फिर्यादीचे भावजी गोविंद यास स्वतःच्या पिस्तुलाने कानशिलात गोळी घालून आत्महत्या केली, अशी आरोप फिर्याद लक्ष्मण चव्हाण याने पोलिसांत दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पूजा देविदास गायकवाड हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गोविंद बर्गे यांचा गेवराई तालुक्यातील लुखामसला येथे प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. पोलिसांना मंगळवारी एका कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने याप्रकरणाचा तपास सुरु केला होता. तेव्हा पूजा गायकवाड या नर्तिकेचे नाव समोर आले होते. गेल्या काही महिन्यांपासून गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील जवळीक वाढली होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या काळात गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन घेऊन दिला होता. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. गोविंद बर्गे सोमवारी रात्री पूजाची समजूत काढण्यासाठी बार्शी तालुक्यातील ससुरे येथे पूजा गायकवाडच्या घरी गेले होते. यानंतर गावाबाहेर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता. गोविंद बर्गे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पोलीस हत्येचा पैलूही पडताळून पाहत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=_iifxyjhgc

आणखी वाचा

प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं, नंतर आत्महत्येचा बनाव रचला, जालन्यात थरारक घटना

आणखी वाचा

Comments are closed.