IND vs AFG: तिसऱ्या वनडेत पावसाचे संकट? जाणून घ्या चेन्नईच्या हवामानाचा अंदाज

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील शेवटचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (M.A Chidambaram stadium Chepauk) होणार आहे. भारतीय संघ ही मालिका 3-0 ने जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर अफगाणिस्तान आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल, कारण भारताने आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, 20 जून रोजी चेन्नईच्या हवामानाचा मिजाज कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

एक्यू वेदरच्या (AccuWeather) रिपोर्टनुसार, 20 जून रोजी चेन्नईचे तापमान 28 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. आकाश अंशतः ढगाळ आणि ऊन-सावलीचे असेल. हवेत आर्द्रता 66 टक्के असण्याची शक्यता वर्तवली जात असून वाऱ्याचा वेग ताशी 18 किलोमीटर असेल. तसेच पावसाची शक्यता 15 टक्के आहे, जे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे बाधित झाला होता, त्यामुळे तो 50 ऐवजी 25-25 षटकांचा खेळवण्यात आला होता. मात्र, लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात प्रचंड उष्णता होती आणि पावसामुळे कोणताही अडथळा आला नव्हता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल, तर टॉस दुपारी 1:00 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल, तर लाइव्ह स्ट्रीमिंग जियोस्टार (JioStar) ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होण्याची दाट शक्यता असून, यशस्वी जयस्वाल (Yashavi jaiswal) प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर जाऊ शकतो, तर नितीश रेड्डी (Nitish Kumar Reddy & Harshit Rana) आणि हर्षित राणा यांना संधी मिळू शकते. दुखापतीमुळे रेड्डी दुसरा सामना खेळू शकला नाही, तर हर्षितला तिसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये स्थान मिळाले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, गुरनूर बरार, प्रिंस यादव.

Comments are closed.