भारतीय संघात हर्षित राणाची वाईल्ड कार्ड एन्ट्री! पहा कसा आहे वनडे, टी20 आणि कसोटीतील रेकॉर्ड
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. तर मालिकेतील तिसरा सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवसाआधी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला आहे. हर्षितला 2024 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत, कसा राहिलाय हर्षितचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
जर हर्षितची वनडे क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली, तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये 26 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 27.38 ची राहिली आहे. तर 39 धावा खर्च करुन 4 गडी बाद ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. कसोटी आणि टी20 पेक्षा हर्षितने वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आगामी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पाहता, त्याला सातत्याने भारतीय संघात संधी दिली जात आहे.
हर्षित राणाला कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 2 कसोटी सामन्यातील 3 डावात गोलंदाजी करताना त्याला केवळ 4 गडी बाद करता आले आहेत. यादरम्यान त्याच्या गोलंदाजीची सरासरी 50.75 इतकी राहिली आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने 9 सामन्यातील 8 डावात गोलंदाजी करताना केवळ 9 गडी बाद केले आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याची गोलंदाजीची सरासरी ही 33.00 ची राहिली आहे.
हर्षित राणाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. पण ही स्पर्धा सुरु होण्याआधीच तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो ही स्पर्धा खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2026 स्पर्धेलाही मुकावं लागलं होतं. त्यानंतर तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये आपल्या फिटनेसवर मेहनत घेत होता. आता तो फिट होताच, त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी तो न्यूझीलंडविरूद्ध आपला शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आता त्याला अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या तिसऱ्या वनडेत खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
Comments are closed.