नक्की चाललंय काय? एकामागून एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडली IPL ची साथ अन् CSK टेन्शनमध्ये… ‘तो

मॅट शॉर्ट टू आयपीएल 2026 ची सुरुवात चुकवणार : चेन्नई सुपर किंग्ससाठी इंडियन प्रीमियर लीग 2026च्या सुरुवातीपूर्वी अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. संघाचा ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर मॅथ्यू शॉर्ट (Matthew Short) अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. ‘क्रिकबज’च्या रिपोर्टनुसार, तो नंतर संघात सामील होणार आहे. इतकंच नाही, तर खराब फॉर्म आणि बदललेल्या टीम स्ट्रॅटेजीमुळे त्याला आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 साठी ऑस्ट्रेलियन संघातूनही वगळण्यात आलं आहे.

CSK साठी मोठी डोकेदुखी

मॅथ्यू शॉर्टया अनुपस्थितीमुळे CSK ची चिंता वाढली आहे. कारण तो संघातील एकमेव स्पेशालिस्ट ऑफ-स्पिनर होता. त्याच्या गैरहजेरीत प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुभवी स्पिन-बॉलिंग ऑलराउंडरची कमतरता जाणवू शकते. सध्या संघ डेवाल्ड ब्रेव्हिस, जेमी ओव्हरटन, नूर अहमद आणि मॅट हेन्री यांना चार विदेशी खेळाडू म्हणून प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

आणखी एक धक्का

सीएलकेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल 2026 हंगामातून बाहेर पडला आहे. डेथ बॉलिंग मजबूत करण्यासाठी तो महत्त्वाचा पर्याय मानला जात होता. आता कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि टीम मॅनेजमेंटसमोर योग्य रिप्लेसमेंट शोधण्याचं मोठं आव्हान आहे.

बार्टमॅनशी संपर्क

रिपोर्टनुसार, सीएसकेने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ऑटनिएल बार्टमन याच्याशी संपर्क साधला आहे. तो सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये हैदराबाद किंग्समेनकडून खेळत आहे. विशेष म्हणजे, तो मेजर लीग क्रिकेटमधील CSK च्या सिस्टर फ्रँचायझी टेक्सास सुपर किंग्सचा भाग असल्यामुळे त्याचा संघात समावेश होणं सोपं जाऊ शकतं.

आतापर्यंत IPL मधून बाहेर गेलेल्या खेळाडूंची यादी –

  • केकेआर – हर्षित राणा (गुडघ्याची दुखापत, स्पर्धेबाहेर)
  • सीएसके – नॅथन एलिस (हॅमस्ट्रिंगची दुखापत, स्पर्धेबाहेर), मॅथ्यू शॉर्ट (अंगठ्याला फ्रॅक्चर)
  • मुंबई – अथर्व अंकोलेकर (गुडघ्याची दुखापत, स्पर्धेबाहेर)
  • एसआरएच – जॅक एडवर्ड्स (पायाची दुखापत, स्पर्धेबाहेर), पॅट कमिन्स (पाठीची दुखापत, सुरुवातीचे सामने मुकण्याची शक्यता), ईशान मलिंगा (खांद्याची दुखापत)
  • आरआर – सॅम करन (जांघेची दुखापत, अनुपलब्ध राहण्याची शक्यता), डोनोव्हन फरेरा (खांद्याची दुखापत)
  • एलएसजी – वानिंदू हसरंगा (हॅमस्ट्रिंगची समस्या), मोहसीन खान (गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून सावरत आहे), मयंक यादव (फिटनेसबाबतच्या चिंता अद्याप कायम)
  • आरसीबी – जोश हेझलवुड (हॅमस्ट्रिंग/अकिलीसची समस्या, सहभाग लांबणीवर)
  • डीसी – मिचेल स्टार्क (कामाचा ताण)

हे ही वाचा –

IPL 2026 : आला अन् पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार, जैस्वालने जडेजाला धु धु धूतला, व्हिडिओ तुफान व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.