अश्लील हावभाव केले, काहींचे दुधाचे दात पडलेले नाहीत अन् आव आणतात; दादा भुसेंची विधानसभेत आदित्य
आदित्य ठाकरे वर दादा भुसे: शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी काल सभागृहात प्रस्ताव 293 अन्वये प्रस्ताव मांडला, मात्र यावेळी बोलताना त्यांना अडवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. भास्कर जाधव हे अध्यक्षांकडे हातवारे करत जोरदार बोलत होते. जाधव यांच्या या कृतीने शिंदेसेनेचे मंत्री आणि आमदार वेलमध्ये उतरले होते. हा सगळा गोंधळ सुरू असताना ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडे हातवारे करत सभागृहात आले. त्यांच्या या कृतीमुळे गोंधळ वाढला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती. यावरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) चांगलेच आक्रमक झाले. दादा भुसे यांनी आज (दि. 18) विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
दादा भुसे म्हणाले की, कालची घटना अतिशय गंभीर आहे. बाहेर गेल्यानंतर जे हावभाव करण्यात आले ते अतिशय अश्लील आहेत. आपल्या सभागृहाला काळिमा लावणारे ते हावभाव आहेत. ती क्लिप आल्यानंतर आम्हाला बाहेर शर्मेने मान खाली घालावी लागत आहे. खूप हात वारे केले, खूप आव आणला म्हणजे माणूस खूप बहाद्दर होतो, अशातला काही भाग नाही. सभागृहात आलेला प्रत्येक प्रतिनिधीचं त्याच्या भागात काहीतरी योगदान असतं. त्याचं कर्तुत्व असतं आणि जनतेच्या आशीर्वादाने इकडे येत असतो.
सहनशीलतेची मर्यादा असते
काही लोकांचे अजून दुधाचे दात पडलेले नाहीत आणि ते आव आणणार, काही पण शब्दप्रयोग करणार, ही शोभा देणारी गोष्ट नाही. त्या संदर्भात कडक शासन होण्याची आवश्यकता आहे. कालचे जे हावभाव होते ते अतिशय अश्लील होते. सामंजस्याने चर्चा होऊन मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत आक्रमकता दाखवता. इथे आलेला प्रत्येक सदस्य त्या गोष्टीला सक्षम आहे. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते. सहनशीलतेची मर्यादा असते. अध्यक्ष आपल्याकडून ज्ञानदानाची अपेक्षा आहे, असे दादा भुसे यांनी म्हटले होते.
आदित्य ठाकरेंची टीका
आदित्य ठाकरे म्हणाले होते की,परवा सभागृहात चड्डी बनियन गँगच्या लोकांनी जे काही ओम भट स्वाह: केलं ते आपण सर्वांनी पाहिलंय. म्हणूनच मी हातवारे केले, टाचण्या-टोचण्याबाबत. हो केले मी हातवारे, माझ्यावर करा कारवाई असे म्हणत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. उपमुख्यमंत्र्यांइतके नमक हराम, गद्दार, एहसान फरामोश व्यक्ती पाहिले नाहीत. यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी आयुष्यात पाहिला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी थेट नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता.
https://www.youtube.com/watch?v=IXQ1K9QVZVM
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.