जैन मुनी म्हणाले, ‘आमच्या धर्मासमोर कोणाला जुमानत नाही’, मराठी एकीकरण समितीने दंड थोपटले

दादर काबूटर खाना: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री टाकून दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana)) झाकून बंद केला होता. मात्र, 6 ऑगस्टला जैनधर्मीयांनी (Jain Community) अचानक हल्लाबोल करत कबुतरखान्यावरील ही ताडपत्री फाडून टाकली होती. यावेळी दादर (Dadar News) कबुतरखान्याच्या परिसरात जमलेला जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला होता. पालिकेने ताडपत्री टाकण्यासाठी वापरलेले बांबू मोडून टाकण्यात आले होते. तसेच जैन समाजातील काही महिला सुतळी आणि दोऱ्या कापण्यासाठी चाकू घेऊन आल्या होत्या. या सगळ्यानंतर रविवारी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी जहाल भाषा वापरत आम्ही आमच्या धर्मासमोर न्यायालयालाही मानत नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या धमकीनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता जैन समाजातील काही लोकांच्या या अरेरावीविरुद्ध मराठी एकीकरण समिती मैदानात उतरणार आहे.

मराठी एकीकरण समितीने जैन समुदायाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे, शासकीय नुकसान करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खायला घालणाऱ्या लोकांवर कारवाी झालीच पाहिजे. कबुतरखाना हा कायमचा बंद झाला पाहिजे. त्यासाठी बुधवारी दादरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. त्यामुळे आता पोलीस मराठी एकीकरण समितीच्या या आंदोलनाला परवानगी देणार का, हे पाहावे लागेल. मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्यास मनसे आणि ठाकरे गट यांच्यासारखे राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करु शकतात.

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना पुन्हा ताडपत्रीने झाकला

जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सरकार आणि न्यायालयाला आव्हान दिल्यानंतर पुढील काही तासांतच चक्रं फिरली आणि मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना पुन्हा एकदा ताडपत्रीने झाकून टाकला. पालिकेने गेल्यावेळीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने चारही बाजूने ताडपत्री लावून एकही कबुतर आतमध्ये शिरणार नाही, याची व्यवस्था केली आहे.  कबुतरखान्याच्या चारही बाजूंनी गोलाकार बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. तसेच परिसरात दंगल नियंत्रण पथकासह प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे जैन समाजाला याठिकाणी आंदोलन करणे शक्य होणार नाही. जैनधर्मीयांनी आंदोलन करत 6 ऑगस्ट रोजी ताडपत्री हटविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावर न्यायालयाने ही ताशेरे ओढले. कबुतरखाना बंद की सुरू याची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट ला पार पडणार आहे . तोपर्यंत न्यायालयाचा आदेश असल्याने कबुतरखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

https://www.youtube.com/watch?v=7of9pgagd9g

आणखी वाचा

दादरच्या कबुतरखान्यावर रात्रीतून पुन्हा ताडपत्री टाकली, चारही बाजूने पोलीस तैनात, दंगल नियंत्रण पथकही हजर

गरज पडली तर शस्त्रंही उचलू, आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही; जैन मुनींची धमकी

आणखी वाचा

Comments are closed.