दादर रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा स्वत:वरच चाकू हल्ला, होमगार्डने अडवलं, पण…; धक्कादायक घटना CCT


दादर: अलीकडेच मुंबईतील काळाचौकी परिसरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार करून स्वतःचा गळा चिरत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या भीषण घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. गजबजलेल्या काळाचौकी (Dadar Railway Station)भागात घडलेल्या या रक्तरंजित प्रकाराने संपूर्ण मुंबई हादरली होती. या घटनेचीच चर्चा सुरू असताना आता दादर रेल्वे स्थानकावरही (Dadar Railway Station)असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Dadar Railway Station)

एका प्रवाशाने अचानक स्वतःवरच धारदार चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानकावर सेवेवर असलेल्या होमगार्डने तत्परतेने धाव घेत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. मात्र, त्यानंतरही त्या प्रवाशाने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.(Dadar Railway Station)

दादर रेल्वे स्थानक: त्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वकिली केली होती

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन होमगार्ड संबंधित प्रवाशाला जोराने पकडून समजावून सांगताना दिसत आहेत. याच दरम्यान दादर स्थानकावर एक एक्स्प्रेस ट्रेन येताना दिसते. हे पाहून संबंधित प्रवाशी ट्रेनच्या दिशेनं धाव घेतो. मात्र होमगार्ड राहुल सरोज यांनी त्याचा पाठलाग करून त्याला वेळीच पकडलं, यावेळी तो प्रवासी हिसके देऊन स्वत:ची सुटका करून घेण्याचा जोरदार प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसतो आहे. मात्र सरोज यांनी त्याला घट्ट पकडून त्याचा जीव वाचवला. हा सगळा प्रकार दादरच्या फलाट क्रमांक १२ वरती घडला आहे. या घटनेनं परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

दरम्यान संबंधित प्रवाशाने आपलं जीवन संपवण्याचा असा प्रयत्न का केला? इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागे काय कारण आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.  दादर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाने अशाप्रकारे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.