डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्सचा आयपीओ 81.88 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?

DAM कॅपिटल ॲडव्हायझर्स IPO GMP मुंबई: एकीकडे शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु असल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान गेल्या आठवड्यात झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे बीएसई आणि एनएसईवर मोठ्या प्रमाणात आयपीओ लिस्ट होत आहेत. आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं देखील पाहायला मिळालं. डिसेंबर महिन्यात  शेअर बाजारात लिस्ट झालेल्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगला प्रतिसाद दिला आहे.  2024 च्या शेवटच्या आठवड्यात देखील आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. DAM Capital Advisors चा आयपीओ सबस्क्राइब करण्याची मुदत काल संपली. हा आयपीओ 81.88 पट सबस्क्राइब झाला आहे.

गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून हा आयपीओ  98.47 पट सबस्क्रइब झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी  या आयपीओला 26.80 सबस्क्राइब केलं. तर, मान्यताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 166.33 पट सबस्क्राइब केलं.

DAM Capital Advisors चा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल यासाठी होता. म्हणजेच या आयपीओच्या माध्यमातून जी रक्कम उभारली जाईल ती रक्कम शेअर विक्री करणाऱ्यांकडे जाईल. कंपनीनं आयपीओसाठी किंमतपट्टा 269-283 रुपये निश्चित केला होता. एका लॉटमध्ये 53 शेअर निश्चित करण्यात आले होते.

डॅम कॅपिटल ॲडव्हायझर्स आयपीओ चा जीएमपी किटिवार?

दाम कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्सचा किंमतपट्टा 283 रुपये निश्चित करण्यात आली होती. सध्या आयपीओचा जीएमपी 55 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना एका शेअरला 160 रुपये अधिक मिळू शकतात. हा आयपीओ सबस्क्राइब करण्यासाठी 19 डिसेंबरला खुला झाला होता तो 23 डिसेंबरला बंद झाला. आयपीओवर बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात 24 डिसेंबरला शेअर जारी केले जाणार आहेत. तर, लिस्टींग 27 डिसेंबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहेत.

डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्स भारतातील प्रमुख गुंतवणूक बँकिंग कंपनी पैकी एक आहे. ही कंपनी इक्विटी कॅपिटल मार्केट, मर्जर आणि  अ‍ॅक्विजिशन, प्राइवेट इक्विटी, संरचित आर्थिक सल्ला आण ब्रोकिंग आणि रिसर्चसह इतर सेवा देते.

2022- 2024 च्या काळात कंपनीचं उत्पन्न एकूण 38.77 टक्क्यांच्या दरानं सीएजीआरनं वाढून 182 कोटी रुपयांवर गेलं आहे. कंपनीनं आतापर्यंत 72 इक्विटी कॅपिटल मार्केट व्यवहार यशस्वीपणे केले आहेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

इतर बातम्या :

धक्कादायक! जगातील प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचं कर्ज, कर्जात कोणता देश कितव्या क्रमांकावर?

ख्रिसमसपूर्वी सोन्यानं दिला दणका, दरात झाली मोठी वाढ, 10 ग्रॅमसाठी किती द्यावे लागतात पैसे?

अधिक पाहा..

Comments are closed.