भूक लागलीय, खायला द्या, पश्चाताप होतोय, नातेवाईकांच्या घरी दत्तात्रय गाडे काय काय म्हणाला?
पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास स्वारगेटहून फलटणला जाणाऱ्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये नेऊन आरोपीनं लैंगिक अत्याचार केला होता. तिथून आरोपी फरार झाला होता. आरोपी स्वारगेटहून फरार झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील गुनाट गावात उसात लपला होता. दत्तात्रय गाडे दोन दिवसांपासून उसात लपून बसला होता. तिथून बाहेर येऊन नातेवाईकाच्या घरी येत त्यानं भूक लागलीय असं सांगितलं होतं. तिथून पाण्याची बाटली घेऊन तो गेला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली अन् पुढे दत्तात्रय गाडेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
नातेवाईकांच्या घरी दत्तात्रय गाडे काय म्हणाला?
दत्तात्रय गाडे दोन दिवस शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात जवळपास 50 तास सर्च ऑपरेशन राबवलं. रात्री बाराच्या सुमारास गावातील नातेवाईकाच्या घरी दत्तात्रय गाडे आला होता. तिथं त्यानं प्रचंड भूक लागलीय, काही तरी खायला द्या. यानंतर नातेवाईकांनी त्याला खायला न देता पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी दत्तात्रय गाडेनं पश्चाताप झालाय, जे काही केलं ते चुकीचं आहे, पोलिसांना सरेंडर व्हायचंय, असं म्हटलं. त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली.
नातेवाईकांनी माहिती दिली अन् पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दत्तात्रय गाडेची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले. पोलिसांच्या 13 टीम तैनात झाल्या, डॉग स्कॉड तैनात झालं. यानंतर आरोपीला शोधण्यात आलं. तो उसात लपून बसला होता. गाडे गेले दोन दिवस उसात राहत होता, झोपत होता. पोलिसांनी त्याला तिथूनचं अटक केली. गाडेच्या अटकेसाठी 100 पोलीस गुनाट गावात दाखल झाले होते.
पुणे पोलीस, क्राईम ब्राँच आणि गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे. गुनाटमध्ये दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. पुण्यात आणल्यानंतर दत्तात्रय गाडेला लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दत्तात्रय गाडेची पुण्यातील ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आता दत्तात्रय गाडेला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात त्याला हजर करण्यात येणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=P6KJ4DWGLAU
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.