दत्तात्रय गाडे रोज रात्री स्वारगेट एसटी स्टॅंडवर सावज शोधायचा; पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर का
पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून फरार झाला आहे. तब्बल 70 तासांनंतर नराधम आरोपीला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. मंगळवारी पहाटे फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आलेल्या असताना त्या तरूणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने एका शिवशाही बसमध्ये अत्याचार केला होता. आरोपीला पकडण्यासाठी 500 पोलिसांचा फौजफाटा, ग्रामस्थ, ड्रोन, डॉगस्कॉड यांच्या मार्फत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी एक ते दिड वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या मुळगावी गुनाट येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला पुण्याकडे आणताना पोलिसांनी दम देताच गाडे कारमध्येच पोपटासारखा बोलू लागला.
दत्ता गाडेने सगळंच सांगितलं…
आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यालाा गाडीमध्ये बसवलं आणि पुण्याला आणण्यात आलं. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाडेची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्टॅंडवर जाऊन सावज शोधायचा अशी माहिती समोर आली. मोबाईलच्या गेल्या दोन महिन्याच्या तांत्रिक विश्लेषणातून माहिती समोर आली आहे.
दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी कबुली गाडे याने दिली आहे. यापूर्वी ही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होतं. दत्ता गाडेने याआधी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केला केला असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. काही महिलांसोबत गोड बोलून मोबाईल नंबर घेऊन जवळीक निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
तब्बल 70 तास पोलिसांपासून आरोपी लपून राहिला
तरुणीवरील अत्याचार केल्यानंतर तब्बल 70 तास पोलिसांपासून आरोपी लपून राहिला होता. मध्यरात्री पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढला आणि एका बेबी कॅनलजवळून आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी हा गावातच असल्याच्या संशयातून तपास सुरू झाला होता. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी आपली तपास पथके पाठवली होती. आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकासह ड्रोनची देखील मदत घेतली.
नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली अन्…
आरोपी गुणाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथक आणि ड्रोनच्या सह्याने आरोपीचा शोध घेतला. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं. पण तिथं तो सापडलाच नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेदहा वाजता दत्ता गाडे नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी पाणी पिण्यासाठी आला होता. त्याने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली आणि तिथे गुन्ह्याची कबुली दिली. नातेवाईकांच्या घराच्या परीसरात असलेल्या एका बेबी कॅनॅालमध्ये झोपून राहिला होता. याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
अधिक पाहा..
Comments are closed.