सुनेची निर्घृण हत्या
तेलंगणातील महबूबनगर जिह्यातील घटना
हैदराबाद: तेलंगणातील महबूबनगर जिह्यात दीड एकर जमिनीच्या वादातून 28 वषीय सुनीता हिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. सोमवारी शेताकडे जात असताना सासरच्या चौघांनी तिला अडवून घरी नेले आणि धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. सुनीताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सासरे माणिक्मय नाईक, दीर मान्या नाईक व पांडु नाईक आणि पांडुची पत्नी पार्वती हे चौघे फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके नेमण्यात आली आहेत.
सुनीताच्या नावावर असलेली दीड एकर जमीन हा वादाचा केंद्रबिंदू असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुमारे वर्षभरापूर्वी कौटुंबिक वाद मिटवताना पतीच्या नावावरील जमीन सुनीता आणि तिच्या दोन मुलींच्या भविष्यासाठी तिच्या नावावर करण्यात आली होती. या निर्णयाला सासरच्या मंडळींचा विरोध होता. जमीन सोडण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.
Comments are closed.