पर्यटकाची टोपी गिळल्याने ‘फिओना’ पाणघोड्याचा मृत्यू, सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयावर शोककळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील ओहायोच्या सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयातील जगप्रसिद्ध नाईल पाणघोडा ‘फिओना’ हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका पर्यटकाने हवेत उडवलेली टोपी चुकून गिळल्याने तिच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. अशी माहिती प्राणिसंग्रहालयाने दिली आहे. या घटनेमुळे प्राणिसंग्रहालयासह जगभरातील तिच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

प्राणिसंग्रहालयाचे संचालक डेव्ह जेनिक यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या बातमीची आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. आम्हाला सर्वांना मोठा धक्का बसला असून तिने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र तिचे शरीर साथ देईनासे झाले, असे त्यांनी सांगितले. नऊ वर्षांच्या या पाणघोडय़ाच्या शरीरातून विणलेली टोपी बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तिला वाचवण्यात अपयश आले.

8 नोव्हेंबर रोजी एका पर्यटकाने हवेत भिरकवलेली टोपी छतावरील पंख्यामुळे फिओनाच्या पिंजऱ्यात गेली आणि तिने चुकून गिळली. त्यानंतर तिच्या प्रकृतीच्या समस्या सुरू झाल्या. याआधी 17 नोव्हेंबरला प्राणिसंग्रहालय ‘फेसबुक’ पोस्टद्वारे तिच्यावर 24 तास लक्ष ठेवून होते, टोपी शरीरातून बाहेर पडून पूर्ववत होईल, अशी आशा व्यक्त केली होती.

Comments are closed.