मणिपूरमध्ये भेसळयुक्त दारूच्या सेवनामुळे 8 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरच्या चंडेल जिह्यात भेसळयुक्त दारू प्यायल्याने तीन दिवसांत आठ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, 18 नोव्हेंबर रोजी पाच जण, 19 नोव्हेंबर रोजी एक आणि शुक्रवारी दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांनी काकचिंग जिह्यातील सुगानू येथून दारू खरेदी केली होती, असे तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी बाधित भागातील लोकांना स्थानिक दारू किंवा संशयास्पद विक्रेत्यांकडून दारू खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक अहवालातून तीव्र पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता यांसारखी लक्षणे समोर आली आहेत.

Comments are closed.