होर्मुझमध्ये 9 भारतीय जहाजांवर सरकारची नजर
सुरक्षेसाठी केंद्र सरकार सतर्क : भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचे उपाय वाढवले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडील परिसरात भारतीय ध्वज असलेली किंवा भारताशी संबंधित अशी 9 जहाजे सध्या सरकारच्या देखरेखीखाली आहेत. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.
अलीकडच्या काळात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय खलाशांचाही समावेश असल्याने भारताने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ओमानजवळ ‘़तारा गॅस’ या एलपीजी वाहतूक करणाऱ्या जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर 24 खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. त्यापैकी दोन भारतीय खलाशांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनांमुळे सागरी वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
9 जहाजांवर विशेष देखरेख
भारताशी संबंधित 9 जहाजांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय ‘़ई-नाविक’ या खलाशी आणि जहाजांच्या देखरेख प्रणालीद्वारे होर्मुझच्या पश्चिमेकडील पर्शियन आखातात 800 हून अधिक जहाजांवर, तर पूर्वेकडील ओमानच्या आखातात 200 हून अधिक जहाजांवर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत भारतीय ध्वज असलेल्या किंवा भारतासाठी माल घेऊन जाणाऱ्या जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून एकूण 86 वेळा प्रवास पूर्ण केला आहे.
केंद्र सरकारकडून सुरक्षेसाठी विशेष निर्देश
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जहाजांच्या सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये धोकादायक सागरी क्षेत्रातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे, वेळोवेळी सुरक्षा सूचना जारी करणे, जहाज कंपन्या आणि चालकांशी नियमित संपर्क ठेवणे तसेच भारतीय खलाशांना संभाव्य धोक्मयांची माहिती देणे यांचा समावेश आहे. याशिवाय विदेश मंत्रालय, भारतीय दूतावास, सागरी क्षेत्रातील संबंधित संस्था आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी समन्वय वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
भारतीय खलाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
जहाजांवरील हल्ल्यांमुळे खलाशांचे जीवन धोक्मयात येण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारतीय सागरी हितसंबंधांचे संरक्षण करणे आणि खलाशांना वेळेवर मदत उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे सोनोवाल यांनी स्पष्ट केले. हल्ल्यांमध्ये प्रभावित झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई आणि आवश्यक मदत मिळण्याच्या प्रक्रियेचाही त्यांनी आढावा घेतला आहे.
Comments are closed.