भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण करार

एकमेकांच्या भूभागावर 3,000 सैनिक तैनात करू शकणार : 5 युद्धनौका, 10 लष्करी विमाने तैनात करण्याचीही परवानगी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि रशिया यांच्यातील ‘रेसिप्रोकल एक्स्चेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट’ (आरईएलओएस) हा संरक्षण करार आता अंमलात आला आहे. या करारानुसार, दोन्ही देश एकमेकांच्या भूभागावर 3,000 पर्यंत सैनिक तैनात करू शकतील. तसेच, पाच युद्धनौका आणि 10 लष्करी विमाने तैनात करण्याची परवानगीही या करारामध्ये आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांचे लष्करी तळ, हवाई तळ आणि बंदरे वापरू शकल्यामुळे दीर्घकालीन लष्करी तैनाती आणि कारवाया सुलभ होतील. तथापि, हा करार युद्धासाठी नसून त्याचा वापर केवळ शांतताकालीन प्रशिक्षण, संयुक्त कवायती आणि रसद पुरवठ्यासाठी केला जाईल. या करारामुळे दोन्ही देशांमधील लष्करी समन्वय आणि सहकार्य आणखी वाढेल.

रशियाशी करण्यात आलेल्या करारामध्ये लॉजिस्टिकल सपोर्टचाही समावेश आहे. या करारानुसार इंधन, पाणी, दुरुस्ती, तांत्रिक संसाधने आणि इतर आवश्यक पुरवठा केला जाईल. विमानांसाठी हवाई वाहतूक नियंत्रण आणि उ•ाणाशी संबंधित सेवा देखील पुरवल्या जातील. या करारावर फेब्रुवारी 2025 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये रशियाने त्याला मंजुरी दिली. आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही लागू होणार आहे. हा करार पाच वर्षांसाठी लागू राहील आणि परस्पर संमतीने त्याची मुदत वाढवता येईल. भारत आणि रशिया यांच्यातील सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री अनेक दशके जुनी आहे. अनेक वादळे येऊनही त्यांची मैत्री एका मजबूत स्तंभाप्रमाणे अढळ राहिली आहे. इराण युद्ध आणि होर्मुझ युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन पारंपरिक मित्रराष्ट्रांनी आता एक असा निर्णय घेतल्यामुळे अमेरिका आणि चीनसारख्या देशांना नक्कीच फटका बसेल.

रशियाकडून अधिकृत दुजोरा

रशियाच्या अधिकृत कायदेशीर माहिती प्रणालीवर प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, या करारानुसार दोन्ही देश एकावेळी एकमेकांच्या प्रदेशात जास्तीत जास्त पाच युद्धनौका, दहा लष्करी विमाने आणि 3,000 सैनिक तैनात करू शकतात. ही तैनाती पाच वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. रशियन संसदेच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीचे उपसभापती व्याचेस्लाव्ह निकोनोव्ह यांनी या तरतुदीला दुजोरा दिला.

दोन्ही देशांना अनेक फायदे

► कराराच्या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन लष्करी सहकार्याला एक नवीन दिशा मिळणार

► भारताच्या मालकीच्या रशियन बनावटीच्या लष्करी उपकरणांची देखभाल व दीर्घकालीन तैनातीसाठी करार उपयुक्त

► करारामध्ये संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण कार्यक्रम आणि मानवतावादी मदत कार्यांचाही समावेश

► यजमान देश युद्धनौकांना बंदर सेवा, दुरुस्ती सुविधा, पाणी, अन्न आणि इतर तांत्रिक संसाधने पुरवेल

► लष्करी विमानांसाठी हवाई वाहतूक नियंत्रण, उ•ाण माहिती, नेव्हिगेशन प्रणाली, पार्किंग, सुरक्षा सेवांचा समावेश

► इंधन, लुब्रिकेंट्स आणि तांत्रिक दुरुस्ती यांसारख्या सेवा सशुल्क तत्त्वावर पुरवल्या जातील.

 

……………

Comments are closed.