‘मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती’; अटकेनंतर भोंदू गडगे नको नको ते बरळला

अहिल्यानगर क्राईम न्यूज: मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) याच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना (Sangamner Police) यश आले आहे. सोबतच भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार देखील पोलिसांकडून सिल करण्यात आला. संगमनेर पोलीसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेत वडगावपान येथील दत्तधाम दरबारात स्पाॅट पंचनामा देखील केला. यावेळी तपासाचा भाग म्हणून राजेंद्र गडगे याला दत्तधाम दरबारात नेले असता त्याने पोलिसांसमोर छातीठोकपणे अंनिसला थेट आव्हान करीत मला अडकविण्याचा कट असल्याचे म्हटले. ‘मी लोकांची सेवा करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी मंत्र-तंत्राचा बाप आहे. कारण मी आत्मज्ञानी आहे, अशा शब्दांत भोंदूगिरीचा आरोप असलेला राजेंद्र गडगे याने पोलिसांसमोर छातीठोकपणे आपला म्हणणं मांडलंय. विशिष्ट म्हणजे पोलिसांनी बोलण्यास थांबल्यानंतरहे ‘पोलीस माझा छळ करताहे‘ असे आरोपही त्याने यावेळी केली.

संगमनेर पोलीसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेत वडगावपान येथील दत्तधाम दरबारात स्पाॅट पंचनामा केला. यावेळी पोलीसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेतली. भोंदू गडगेला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. परिणामी दाखल गुन्ह्यासंदर्भात पोलीसांकडून तपास सुरू आहे. या चौकशीचा भाग म्हणून दरबारातील विविध औषधांचे नमुनेही ताब्यात घेतले आहेत. सध्या भोंदू राजेंद्र गडगेची कसून पोलीस चौकशी सुरु आहे. वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवून फसवणूक करणाऱ्या या भोंदूविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.भोंदू राजेंद्र गडगेचा माध्यमांवर संताप…

‘माझ्यात दैवीशक्ती, मी आत्मज्ञानी, भोंदू राजेंद्र गडगेचा दावा’

सर्व आजारी लोक आहेत. इथे फक्त ध्यान केले जाते, वैदिक प्रक्रिया केल्या जातात. सनातन धर्माचेच खंडन केले जात आहे. जर आपण खोटे आहोत आणि जगतोबस्स मी मंत्र तंत्र वापरत नाही, मी आत्मज्ञानी आहे. माझ्याकडे दैवीशक्ती आहे. असा दावा भोंदू गडगेद्वारे कला आहे.

Ahilyanagar Crime News: काय आहे प्रकरण?

राजेंद्र बापू गडगे याने वडगावपान परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक त्याच्या दरबारात हजेरी लावत होते.

आणखी वाचा

Comments are closed.