ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं

कोल्हापूर गुन्हे: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील आदित्य मिलिंद कोळी या अवघ्या 24 वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेमिंगच्या नादात पैसे हरल्यानंतर नैराश्यामध्ये राहत्या घरी गळ्याला दोरी लावत आयुष्याचा शेवट केला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (18 एप्रिल) सायंकाळी उघडकीस आला. कोरोची बस स्थानकामागील आपल्या राहत्या घरी आदित्यने टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आदित्यने वरच्या खोलीमध्ये लोखंडी अँगलला गळ्याला दोरी लावत आयुष्याचा शेवट केला. घरातील मंडळी कामावर गेल्यानंतर हे टोकाचे पाऊल उचललं.

ऑनलाईन गेमिंगच्या नादात पैसे हरला

दरम्यान, आदित्यने आयुष्याचा शेवट करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिट्टीमध्ये ऑनलाईन गेमिंगला बळी पडल्याचं त्याने म्हटलं आहे. या नादात पैसे गमावल्याने हे पाऊल उचलल्याचे नमूद केलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरतीच होती. दरम्यान, त्याचा चुलत भाऊ भालचंद्र संजय कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं

दरम्यान, 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून काही तासांतच संपवल्याची धक्कादायक घटना  घडली होती. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना अटक (Kolhapur Crime News) केल्यानंतर  व्यावसायिकाला करंट देऊन मारल्याचे कबूल केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात रात्री उशिरा घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. मृत व्यक्ती भरतेश राजगोंडा टोपगोंडा असे असून, शेरी मळा परिसरातील शेतात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. अपहरणानंतर आरोपींनी तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती पुढे आली आहे. भरतेश यांना अज्ञातांनी जबरदस्तीने पळवून नेले. काही वेळानंतर त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला कॉल करण्यात आला. या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठराविक ठिकाणी येण्याचा आदेश देण्यात आला. यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्याचे दोन मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र, अपहरणकर्त्यांनी सतत लोकेशन बदलत त्यांना गोंधळात टाकले. काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.