IPL मध्ये काळीजादू…लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, SRH विरुद्धच्या सामन्यात
हैदराबादच्या उप्पल स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील एका रोमांचक सामन्यादरम्यान, अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला. सनरायझर्स हैदराबादच्या एका चाहत्याने सामना सुरु असताना मैदानात लिंबू घेऊन तंत्रमंत्र केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर चेन्नई सुपर किंग्सने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि बीसीसीआयकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यादरम्यान, मैदानात बसलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या एका चाहत्याने सीएसकेची विकेट जाण्यासाठी लिंबावर एक विधी (तंत्र-मंत्र) केला. व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, तो चाहता लिंबूसोबत मंत्रोच्चार आणि विधी करत होता आणि पुढच्याच चेंडूवर सीएसकेचा फलंदाज बाद झाला. विकेट पडताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता सदर व्हिडीओवरुन चेन्नईने बीसीसीआयकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. (CSK complains to BCCI )
CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, काय म्हटलं? (CSK complains to BCCI )
चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांच्या स्वाक्षरीचे, 19 एप्रिल 2026 रोजीचे एक अधिकृत पत्र बीसीसीआयला (BCCI) पाठवण्यात आले. प्रेक्षकांच्या अयोग्य वर्तनाबाबत तक्रार (एसआरएच विरुद्ध सीएसके सामना), असं या तक्रारीच्या पत्राचे शीर्षक आहे. चेन्नई फ्रँचायझीने स्पष्टपणे आरोप केला आहे की, आयपीएल 2026 सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांनी काळीजादू आणि अलौकिक आणि हानिकारक प्रथांचा अवलंब केला. या विधींचा चेन्नईच्या खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर थेट परिणाम झाला, ज्यामुळे त्यांची कामगिरी अत्यंत खराब झाली. बीसीसीआयने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि भविष्यात असा प्रकार प्रतिबंध करण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. ‘भूत आणि जादूटोणा’ या तक्रारीवर बीसीसीआय काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चेन्नईचा 12 धावांनी पराभव- (IPL 2026 CSK vs SRH)
सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 18 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा 12 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 194 धावांची धावसंख्या उभारली. एका टप्प्यावर, चेन्नईचा संघ सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे वाटत होते. कारण चेन्नईला शेवटच्या 10 षटकांत विजयासाठी केवळ 84 धावांची आवश्यकता होती. मात्र, मधल्या षटकांमध्ये ईशान मलिंगाने चेन्नईला धक्का देत दोन विकेट्स पटकावले. शिवम दुबे हा चेन्नईचा शेवटचा आशेचा किरण ठरला होता, परंतु साकिब हुसेन आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर संपूर्ण चेन्नईचा संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.